Kolhapur Politics : महाडिक-मुश्रीफांची दिलजमाई ?; दोघांच्या बुलेट राईडने विरोधकांना धडकी

MP Dhananjay Mahadik : खासदार धनंजय महाडिकांनी केलं सारथ्य...
Hasan Mushrif, Dhananjay Mahadik
Hasan Mushrif, Dhananjay MahadikSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक भाजपमध्ये गेल्यानंतर एकमेकांच्या विरोधात असणारे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि महाडिक आज दोघांची एकत्र बुलेट राईड कोल्हापूरकरांनी पाहिली. महायुतीमुळे हा योग घडून आला असून आज जिल्हा नियोजन मंडळातून जिल्हा पोलिस दलाला देण्यात आलेल्या वाहन वितरणात हा योग घडून आला.

दोघांनी बुलेटवरून मारलेली रपेट जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत असली तरी आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) दोघेही खांद्याला खांदा लावून एकदिलाने लढणार असल्याचे संकेत दिलेत. आज पोलिस ग्राउंडवर वाहन वितरणाचा कार्यक्रम पार पडला. वाहनांचे पूजन झाल्यानंतर हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी बुलेट वरून राईड मारावी, अशी विनंती धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी केली.

Hasan Mushrif, Dhananjay Mahadik
Shirur-Baramati Lok Sabha : अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे यांचा मतदारसंघात चार दिवस ‘आक्रोश’

मुश्रीफ यांनीही त्यांच्या विनंतीला मान दिला मात्र, एक अट घातली. जर तुम्ही गाडी चालवणार असाल तर मी रपेट मारतो अशी विनंती त्यांनी केली. त्यावर महाडिक यांनीही लगेच बुलेटचे हँडल हातात घेत बुलेट चालवली तर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मागील सीटवर बसून बुलेट सवारीचा आनंद घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, दोघांच्याही बुलेट सवारीने जिल्ह्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेला उधाण आले आहे. पालकमंत्री मुश्रीफ हे महायुतीत सहभागी झाल्याने त्यांना महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करावा लागणार आहे. तर महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी धनंजय महाडिक यांच्यादेखील खांद्यावर आहे.

Hasan Mushrif, Dhananjay Mahadik
Dr. Amol Kolhe: अजितदादांच्या चॅलेंजवर अमोल कोल्हेंचं सूचक विधान; म्हणाले, 'खासगीत बोलणं...'

धनंजय महाडिक यांनीच बुलेटचे हँडल हातात घ्यावं, अशी इच्छा थेट मुश्रीफ यांनी व्यक्त केल्यानंतर लोकसभेसाठीची प्रत्येक घडामोड महाडिक यांच्या मार्गदर्शनानुसारच होईल, असे संकेत या निमित्ताने मुश्रीफ यांनी दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात कोल्हापूरच्या राजकारणात नेमकं चित्र काय असेल, हे याची उत्सुकता वाढली आहे.

(Edited By - Rajanand More)

Hasan Mushrif, Dhananjay Mahadik
Maratha Reservation : मराठा आंदोलन मुंबईत धडकणारच!; जरांगेंनी अजितदादांना लगावला टोला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com