Karnataka Government : सरकारला हादरा बसेल...! आमदार पाटलांच्या स्फोटक ऑडिओ क्लिपमुळं खळबळ

Leaked Audio Clip Shakes Karnataka Government : आमदार बी. आर. पाटील हे या क्लिपमध्ये राज्यातील राजीव गांधी हाऊसिंग कॉर्पोरेशनबाबत बोलताना दिसत आहे. ते कर्नाटक राज्य धोरण आणि नियोजन आयोगाचे उपाध्यक्षही आहेत.
MLA BR Patil
MLA BR PatilSarkarnama
Published on
Updated on

Corruption Allegations : सरकारमधील भ्रष्टाचारावर सत्ताधारी आमदारांच्याच एका ऑडिओ क्लिपमुळे कर्नाटकात खळबळ उडाली आहे. आळंद विधानसभा मतदारसंघांचे आमदार बी. आर. पाटील यांची ही क्लिप असून ते थेट राज्यातील अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवताना दिसत आहे. हे सगळं बाहेर आल्यास सरकारला हादरा बसेल, असेही ते म्हणत असल्याने राजकारण तापलं आहे.

पाटील हे या क्लिपमध्ये राज्यातील राजीव गांधी हाऊसिंग कॉर्पोरेशनबाबत बोलताना दिसत आहे. ते कर्नाटक राज्य धोरण आणि नियोजन आयोगाचे उपाध्यक्षही आहेत. त्यांच्या दाव्यानुसार, लाच देणाऱ्यांना या योजनेमध्ये घरे मिळतात. तर लोकांनी निवडून दिलेल्या आपल्यारख्या लोकप्रतिनिधींची पत्रं नाकारली जातात.

पाटील आणि हाऊसिंग मंत्री जमीर अहमद खान यांचे पीए सरफराज खान यांच्यामधील संभाषणाची ही क्लिप आहे. जे पैसे देतात, त्यांनाच घरे मिळतात, हा काय बिझनेस आहे का, असे पाटील म्हणत असल्याचे क्लिपमध्ये ऐकू येते. असे झाल्यास माझ्याबद्द्ल लोकांना आदर कसा वाटेल, असा सवालही ते उपस्थित करताना ऐकू येते.

MLA BR Patil
Aviation safety funding : विमान अपघातानंतर धक्कादायक माहिती समोर; संसदीय समितीच्या रिपोर्टमध्ये मोदी सरकार निशाण्यावर...

सरफराज खान पाटील यांचे आरोप फेटाळताना ऐकू येते. आपल्याला लाच घेतल्याबाबतचे पुरावे दिले तर संबंधिताला जेलमध्ये पाठवले जाईल, असे खान पाटील यांना म्हणाले. त्यानंतर पाटील यांनीही त्यांना इशारा दिला. लाभार्थ्यांची यादी सार्वजनिक झाली तर सरकार हादरून जाईल, असे पाटील म्हणाल्याचे या क्लिपमध्ये ऐकू येते. पाटील यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.

MLA BR Patil
Trump global politics : ट्रम्प यांच्या एका सहीनंतर पाकिस्तानला ‘जी हुजूर’ म्हणावंच लागेल; या ट्रॅपमधून आता सुटका नाही...

आपल्या मतदारसंघात 950 घरांसाठी लाच घेतली गेली, असा दावाही पाटील यांनी केला आहे. पाटील यांची ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर राजकारण तापले असून भाजपने सरकार निशाणा साधला आहे. भाजप नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा म्हणाले, बीआर पाटील जे म्हणाले, ते 100 टक्के खरे आहे. लाच दिल्याशिवाय या सरकारमध्ये कुठलेही काम होत नाही. त्यांचाच आमदार हे म्हणत आहे. सरकार हे मान्य करून चुका सुधाराव्यात. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com