Karnatak Politics: कर्नाटकच्या राजकारणात लवकरच मोठी उलथापालथ? माजी पंतप्रधानांंनीच टाकला बॉम्ब, मोदी-शहांचं नाव घेत म्हणाले...

H D Deve Gowda Political Statement : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री पदावरून नाराजीनाट्य रंगल्याचं दिसून आलं होतं. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना मानणारा काँग्रेसमधील एका गटानं आक्रमक भूमिका घेतली आहे. या गटाकडून डी.के. शिवकुमार यांच्या मुख्यमंत्री पदासाठी मोठा दबाव टाकला जात आहे.
HD kumaraswamy On CM Siddaramaiah
HD kumaraswamy On CM Siddaramaiah Sarkarnama
Published on
Updated on

Karnataka News : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री पदावरून नाराजीनाट्य रंगल्याचं दिसून आलं होतं. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना मानणारा काँग्रेसमधील एका गटानं आक्रमक भूमिका घेतली आहे. या गटाकडून डी.के. शिवकुमार यांच्या मुख्यमंत्री पदासाठी मोठा दबाव टाकला जात आहे.

मुख्यमंत्रिपदी सिद्धरामय्या यांनी अडीच वर्षे पूर्ण केल्याच्या दुसऱ्याच दिवशी शिवकुमार यांच्या समर्थकांकडून ही मागणी जोर धरू लागली आहे. विधानसभेच्या मे 2023 च्या निवडणुकीतील विजयानंतर, सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रि‍पदावरून तीव्र स्पर्धा रंगली होती. याचदरम्यान,आता कर्नाटकमधून राजकारणातून मोठी अपडेट समोर आली आहे.

धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सर्वेसर्वा आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी एच. डी. कुमारस्वामी यांना पुन्हा कर्नाटक मुख्यमंत्री पदाबाबत सूचक विधान केलं आहे. याबाबत ते म्हणाले, केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना पुन्हा मुख्यमंत्री करायचे की नाही, याचा अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घेतील, असं माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी म्हटलं आहे.

कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस (JDS) आघाडीचं एच.डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वातील सरकार 23 जुलै 2019 रोजी विश्वासदर्शक ठराव गमावल्यामुळं कोसळलं होतं. विधानसभेत झालेल्या मतदानात कुमारस्वामींना 99 मतं मिळाली, तर विरोधात 105 मतं पडल्यामुळे त्यांचं अवघ्या 14 महिन्यांचं सरकार पडलं होतं. यावेळी काँग्रेस आणि जेडीएसच्या सुमारे 15-16 बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्याने कुमार स्वामींचं सरकार अल्पमतात आलं होतं.त्यानंतर कर्नाटकमध्ये भाजप सत्तेत परतलं होतं.

HD kumaraswamy On CM Siddaramaiah
Fadnavis Government: फडणवीस सरकारकडून IAS अधिकाऱ्यानंतर 24 तासांच्या आतच सहाय्यक धर्मादाय आयुक्तांचं तडकाफडकी निलंबन,विदर्भ प्रशासनात खळबळ

धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उद्‍घाटना सोहळ्याला माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा उपस्थित होते. ते म्हणाले, ‘‘कुमारस्वामी मुख्यमंत्री होतील की नाहीत, हे सांगणे माझ्या अधिकारात नाही. मोदी आणि शहा यांच्याकडे राजकीय कौशल्य आहे. ते एनडीएची ताकद वाढवण्यासाठी धजदच्या सामर्थ्याचा योग्य वापर करतील असं सांगितलं आहे.

एच. डी. देवेगौडा यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत पाहिलेले ‘सर्वांत वाईट सरकार’ असल्याचं सांगत सिध्दरामय्या यांच्या सरकारव टीकेची झोड उठवली. काँग्रेसच्या प्रमुख पंचहमी योजनांवर टीका करताना त्यांनी सरकारच्या ‘इच्छुक हातांना काम देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत’, असंही म्हटलं.

HD kumaraswamy On CM Siddaramaiah
Junnar Panchyat Samiti: जुन्नरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची मोठी खेळी; एका मतासाठी थेट उपसभापतीपदाची ऑफर; NCP नेही प्लॅन बदलला

देवेगौडा पुढे म्हणाले, मी 93 वर्षांचा आहे. मला मंत्री, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होण्याची आता कोणतीही आकांक्षा नाही. माझा आत्मा शरीर सोडण्यापूर्वी राज्यात सक्षम आणि कार्यक्षम सरकार सत्तेत यावे, अशीच माझी प्रार्थना आहे.

आलमट्टी धरणाची उंची 524 मीटरपर्यंत वाढवण्यास मंजुरी मिळाल्याचा उल्लेख करत त्यांनी हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आपण लढाईचे नेतृत्व करण्यास तयार आहोत, असं त्यांनी सांगितलं. राज्याचे म्हैसूर, कित्तूर आणि कल्याण कर्नाटक अशा विभागांत विभाजन करण्याची गरज नाही. आपण सर्व एकाच आईची मुले आहोत. मजबूत कर्नाटक उभारण्यासाठी आपण एकत्र यायला हवं, असंही त्यांनी आवाहन केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com