

कर्नाटकात 30 आमदारांनी बंडाचा पवित्रा घेतल्याने मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना जोर आला आहे.
हे आमदार दिल्लीला जाऊन काँग्रेस हायकमांडशी भेट घेण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळ फेरबदलासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याने राजकीय अस्थिरता वाढली आहे.
Karnataka congress Political leadership controversy News : गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ब्रेक लागला होता. मात्र मतदान होताच आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनी जोर धरला असून तब्बत ३० आमदारांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे. हे आमदार दिल्लीला तातडीने गेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची खुर्ची धोक्यात असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान कर्नाटकात गेल्या काही दिवसांपासून सतत मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू असून काहीच दिवसांपूर्वी येथील ईडिगा समाजाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली होती. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात समाजासाठी भरीव तरतूद केली नाही असा दावा केला होता. तर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री करावे अशी मागणी केली होती. या मागणीसाठी सुमारे १५ स्वामींजी दिल्लीला जाऊन काँग्रेस नेतृत्वाची भेट घेतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयाची देशभर चर्चा झाली होती. ज्यानंतर शिवकुमार यांच्यासह मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अंतीम निर्णय हा हायकमांड घेतील असे सुतोवाच केले होते. मात्र, काँग्रेस हायकमांडने या चर्चा फेटाळून लावल्या होत्या.
पण आता हायकमांड यांनी लवकरात लवकर हा निर्णय घेऊन शिवकुमार यांना मुख्यमंत्री करावे, तसेच मंत्रिमंडळात फेरबदल करावी असा दबाव ३० भर आमदारांनी तयार केल्याचे दिसत आहे. तर या ३० आमदारांनी नेतृत्व बदलासाठी बंडाचा पवित्रा घेतला असून ते दिल्लीला निघाले आहेत. यामुळे आता काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला असून मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत.
कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमधील जवळपास ३० आमदार एकत्र मिळून तातडीने दिल्लीला रवाना झाले असून ते काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे. तर हे बंड फक्त सरकारमधील मंत्रिमंडळ फेरबदलासाठी असल्याचे बोलले जात आहे. या आमदारांची मागणी सरकारमधील मंत्रिमंडळ फेरबदलाची आहे. आणि त्यासाठीच हे सर्व एकत्र काँग्रेस हायकमांडकडे गेले आहेत.
मात्र यामागे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पदावरून हटवून शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी पक्षाच्या हायकमांडवर दबाव आणण्याचा या आमदारांचा हेतू असल्याची चर्चा आहे. या सर्व चर्चांवर काँग्रेस आमदार अशोक पट्टन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते याबाबत म्हणाले की, जवळपास काँग्रेसचे ३० आमदार एकत्र आले असून निम्म्यांचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पाठिंबा आहे. तर बाकीचे डी.के.शिवकुमार यांच्याबरोबर आहेत, असेही नाही. पण आमची मागणी मंत्रिमंडळात फेरबदलाची आहे.
याआधी आम्हाला मंत्रिमंडळात फेरबदलाबाबत काही आश्वासने देण्यात आली होती. सर्वांना संधी देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. आम्ही फक्त त्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी आम्ही दिल्लीत आहोत. याचा अर्थ हा मुळीच नाही की आम्ही नाराज आहोत किंवा कोणालाही ब्लॅकमेल करत नाहीत. आम्ही फक्त आमची मागणी करत असल्याचे आमदार पट्टन यांनी म्हटलं आहे. तसेच जोपर्यंत जुने चेहरे हटवले जात नाहीत, तोपर्यंत नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार नाही, अशाही या आमदारांची भूमिका आहे.
दरम्यान या राजकीय भूकंपानंतर आता काँग्रेस हायकमांडच्या भूमिकेकडे लक्ष लागले असून हे ३० आमदार केवळ राहुल गांधी यांनाच नाही तर मल्लिकार्जुन खर्गे, के.सी. वेणुगोपाल आणि सुरजेवाला यांनाही भेटण्याची शक्यता आहे. तर या बंडखोर आमदारांची मागणी काँग्रेस हायकमांड पूर्ण करणा का हे पाहावं लागणार आहे.
1. कर्नाटकात सध्या काय घडत आहे?
आमदारांच्या बंडामुळे मुख्यमंत्री बदल आणि मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा सुरू आहेत.
2. किती आमदारांनी बंड केले आहे?
सुमारे 30 आमदारांनी बंडाचा पवित्रा घेतल्याचे सांगितले जात आहे.
3. आमदार कुठे गेले आहेत?
ते दिल्लीला जाऊन काँग्रेस हायकमांडची भेट घेणार आहेत.
4. या बंडाचा उद्देश काय आहे?
मंत्रिमंडळ फेरबदल आणि नेतृत्वावर दबाव आणणे हा उद्देश असल्याचे सांगितले जाते.
5. याचा सरकारवर काय परिणाम होईल?
सरकारवर दबाव वाढून राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.