congress crisis : कर्नाटकात पुन्हा सत्तासंघर्ष पेटला, डीके शिवकुमार यांनी CM पदाचा मुद्दा तापवला, थेट काँग्रेसच्या हायकमांडलाच दिला इशारा

karnataka congress political tension News : कर्नाटक काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा नेतृत्व बदलावरून वादाची ठिणगी पडली आहे. यावेळी स्वत: उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनीच या मुद्द्याला हवा दिली आहे.
Tensions rise as Karnataka Congress leaders Siddaramaiah and Shivakumar clash publicly over chief ministerial ambitions
Tensions rise as Karnataka Congress leaders Siddaramaiah and Shivakumar clash publicly over chief ministerial ambitionsSarkarnama
Published on
Updated on
Summary

• कर्नाटक काँग्रेसमध्ये नेतृत्वाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे.

• उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी विधानसभा निवडणुका संपेपर्यंत प्रतीक्षा करू, अन्यथा वेगळा निर्णय घेऊ असा इशारा दिल्याची चर्चा आहे.

• अडीच वर्षांच्या सत्ता वाटपाच्या करारानुसार मुख्यमंत्रिपद देण्याच्या मागणीवरून पक्षात नाराजी वाढल्याचे सांगितले जात आहे.

karnataka congress News : कर्नाटक काँग्रेसमध्ये नेतृत्वाच्या मुद्द्यावरून सुरू असलेला अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी विविध राज्यांतील विधानसभा निवडणुका पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करू, अन्यथा वेगळा निर्णय घेऊ, असा इशारा हायकमांडला दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पक्ष संघटनेत महत्त्वाची भूमिका बजावूनही सत्ता वाटपाच्या कराराची अंमलबजावणी होत नसल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. अडीच वर्षांच्या सत्ता वाटपाच्या करारानुसार मुख्यमंत्रिपद देण्याचा आग्रह त्यांनी धरला होता; मात्र त्याबाबत ठोस निर्णय झालेला नाही.

मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी शिवकुमार यांच्याशी आपले संबंध ‘दूध आणि मधासारखे’ असल्याचे सांगत एकोपा दर्शवण्याचा प्रयत्न केला. तसेच भाजप-धजदकडून शिवकुमार यांना आकर्षित करण्याचे प्रयत्न होत असल्याच्या चर्चांनाही त्यांनी फेटाळले. दरम्यान, आसाम विधानसभा निवडणुकीसाठी शिवकुमार यांची प्रभारी नेते म्हणून नियुक्ती केली आहे.

Tensions rise as Karnataka Congress leaders Siddaramaiah and Shivakumar clash publicly over chief ministerial ambitions
Chandrapur Congress Crisis : 'ते' नगरसेवक धानोरकर की वडेट्टीवारांचे ? चंद्रपूरमध्ये वाद वाढला, सत्ता जाण्याच्या भीतीने काँग्रेसमध्ये अस्वस्थता

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते आणि ‘ऑपरेशन कमळ’नंतर ते भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे शिवकुमार यांच्या भूमिकेकडे विशेष लक्ष लागले आहे. शिवकुमार यांनी कठीण परिस्थितीतही पक्षनिष्ठा कायम ठेवली असल्याचे सांगत सिद्धरामय्या यांनी त्यांच्यावरील शंका दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

मात्र हायकमांड त्यांच्या दबावासमोर झुकत नसल्याची चर्चा सुरू आहे. पक्ष संघटनेत मोठा वाटा उचलल्यानंतर सत्तेत मात्र उपेक्षा होत असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. मागडी मतदारसंघाचे आमदार एच. सी. बाळकृष्ण यांनी दोन्ही नेते एकत्र राहिल्यास काँग्रेस पुन्हा १४० हून अधिक जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी हस्तक्षेपाची गरज नसल्याचे म्हटले असले तरी परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची चिन्हे दिसत आहेत. नवी दिल्लीतील बैठकीत खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी राजकीय घडामोडींवर चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले.

Tensions rise as Karnataka Congress leaders Siddaramaiah and Shivakumar clash publicly over chief ministerial ambitions
Congress crisis : काँग्रेसने कष्टाने निवडून आणलेले 6 नगरसेवक फुटले : भाजपच्या निकटवर्तीय नेत्याला उपनगराध्यक्ष करण्यावरून पक्षात भूकंप

FAQs :

1. कर्नाटक काँग्रेसमध्ये वाद का सुरू झाला आहे?
मुख्यमंत्रिपदाच्या अडीच वर्षांच्या सत्ता वाटपाच्या कराराची अंमलबजावणी होत नसल्यामुळे हा वाद वाढला आहे.

2. डी. के. शिवकुमार यांनी काय इशारा दिला आहे?
विधानसभा निवडणुका संपेपर्यंत प्रतीक्षा करू, अन्यथा वेगळा निर्णय घेऊ असा इशारा दिल्याची चर्चा आहे.

3. सत्ता वाटपाचा करार काय होता?
काँग्रेसमध्ये अडीच वर्षांनी मुख्यमंत्रिपद बदलण्याचा करार झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते.

4. सध्या कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण आहेत?
सध्या कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आहेत.

5. या वादाचा सरकारवर काय परिणाम होऊ शकतो?
हा वाद वाढल्यास कर्नाटकातील काँग्रेस सरकारमध्ये राजकीय तणाव वाढू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com