Kerala Election Results: केरळमध्ये मोठा उलटफेर! पहिल्याच तासात सत्तेसाठी चुरस

Kerala Assembly Election Results 2026: माकपच्या नेतृत्वाखालील एलडीएफ ६४ जागांवर आघाडीवर, तर काँग्रेसच्या यूडीएफने ६० जागांवर आघाडी घेतली आहे.
Assembly election counting
Assembly election countingSarkarnama
Published on
Updated on

Kerala Assembly Election Results 2026: केरळमधील १४० विधानसभा मतदारसंघांसाठी आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री पिनारई विजयन (Pinarayi Vijayan) यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफ सलग तिसऱ्यांदा सत्ता राखणार की काँग्रेसप्रणीत यूडीएफ पुनरागमन करणार, याचा फैसला आज होणार आहे. भाजप-एनडीएकडूनही काही जागा जिंकत राज्यात आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पहिल्याच तासात गेम फिरला!

मतमोजणीच्या पहिल्याच तासातच मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. माकपच्या नेतृत्वाखालील एलडीएफ ६४ जागांवर आघाडीवर, तर काँग्रेसच्या यूडीएफने ६० जागांवर आघाडी घेतली आहे. भाजप-एनडीएला १ जागेवर आघाडी मिळाली असून, राजीव चंद्रशेखऱ (Rajeev Chandrasekhar) नेमम मतदारसंघातून पुढे आहेत. इतरांना २ जागांवर आघाडी मिळाली आहे.

Assembly election counting
Baramati Bypoll Result 2026: मताधिक्याचा विक्रम मोडण्यासाठी सुनेत्रा पवारांचं पहिलं पाऊल! पहिल्याच फेरीमध्ये 99 टक्के मते

बहुमताचा आकडा किती?

केरळमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी ७१ जागांचा जादुई आकडा गाठणे आवश्यक आहे. सध्याचे ट्रेंड पाहता एलडीएफ आणि यूडीएफ यांच्यात काट्याची टक्कर सुरू असून शेवटपर्यंत सस्पेन्स कायम राहण्याची शक्यता आहे.

९ एप्रिल रोजी झालेल्या मतदानात केरळमध्ये तब्बल ७८.२७ टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्यामुळे आजचा निकाल केवळ राज्यापुरता मर्यादित नसून राष्ट्रीय राजकारणासाठीही महत्त्वाचा मानला जात आहे. केरळ गमावल्यास डाव्यांचे देशातील शेवटचे सत्ताकेंद्र हातातून जाण्याची शक्यता आहे—१९७७ नंतर अशी परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण होऊ शकते.

सुरुवातीच्या कलानुसार UDF आघाडीने 58 जागांवर आघाडी घेतली आहे, तर सत्तारूढ LDF फक्त 22 जागांवर पुढे आहे. याशिवाय NDA आघाडीनेही 7 जागांवर आघाडी मिळवली आहे, त्यामुळे केरलच्या राजकारणात चुरस वाढताना दिसत आहे.

या निवडणुकीत एकूण 883 उमेदवार रिंगणात उतरले असून सर्वांचे राजकीय भविष्य आज ठरणार आहे. सध्या मुख्यमंत्री Pinarayi Vijayan यांच्या नेतृत्वाखालील LDF सरकार सलग तिसऱ्यांदा सत्तेत परतण्याचा ऐतिहासिक प्रयत्न करत आहे. दुसरीकडे, UDF आपली गमावलेली राजकीय ताकद पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे, तर NDA राज्यात आपले खाते उघडण्याच्या आशेने मैदानात उतरले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com