Baramati Bypoll Result 2026: मताधिक्याचा विक्रम मोडण्यासाठी सुनेत्रा पवारांचं पहिलं पाऊल! पहिल्याच फेरीमध्ये 99 टक्के मते

Baramati Assembly Bypoll Result 2026 live updates: बारामती विधानसभा मतदारसंघातून 2019 च्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी एक लाख 65 हजार एवढं मताधिक्य घेत विजय मिळवला होता.
Baramati Bypolls
Baramati Bypolls Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये पोट निवडणूक होत आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मैदानात उतरल्या आहेत. सध्या मतमोजणी सुरू आहे. मतमोजणीच्या पहिल्याच फेरीमध्ये सुनेत्रा पवार यांनी तब्बल 99 टक्के मते मिळाली आहेत.

सध्या बारामती विधानसभा मतदारसंघाबाबत सुनेत्रा पवार किती मोठं विक्रमी मताधिक्य घेणार याबाबत चर्चा सुरू असल्याची पाहायला मिळत आहे. त्यानुसार त्यांची वाटचाल देखील सुरू झाली असून पहिल्याच फेरीमध्ये त्यांनी मोठी आघाडी घेतली आहे. यापूर्वी बारामती विधानसभा मतदारसंघातून 2019 च्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी एक लाख 65 हजार एवढं मताधिक्य घेत विजय मिळवला होता.

Baramati Bypolls
Tamil Nadu Election Result Live: तमिळनाडूत सत्तांतराचे संकेत? विजयची धमाकेदार एन्ट्री! ‘पॉलिटिकल ब्लॉकबस्टर’

यंदा हा विक्रम मोडण्यासाठी एकूण मतदानांपैकी ५५ टक्के मतांची सुनेत्रा पवार यांना आवश्यक आहे.बारामती पोटनिवडणुकीत २ लाख २३ हजार ७०५ , इतकं मतदान झालं आहे. मताधिक्याचा विक्रम करण्यासाठी सुनेत्रा पवार यांना १ लाख २३ हजार २६५ मतांची गरज आहे.

सध्या पहिला मतमोजणीच्या फेरीमध्ये सुनेत्रा पवार यांनी 6500 मतांची आघाडी घेतली असून दुसऱ्या फेरीमध्ये देखील सुनेत्रा पवार या आघाडी वरत आहेत.

आत्तापर्यंत मतदानाची आकडेवारी

२०२४ विधानसभा निवडणूक

मतदानाची टक्केवारी: ७१.८६ टक्के

विजयी उमेदवार: अजित पवार

विजयी मतं: १ लाख ८१ हजार १३२

मताधिक्य: १ लाख १ हजार

२०१९ विधानसभा निवडणूक

मतदानाची टक्केवारी: ७० टक्के

विजयी उमेदवार: अजित पवार

विजयी मतं: १ लाख ९५ हजार ६४१

मताधिक्य: १ लाख ६५ हजार २६५

२०१४ विधानसभा निवडणूक

मतदानाची टक्केवारी: ७३.६९

विजयी उमेदवार: अजित पवार

विजयी मतं: १ लाख ५० हजार ५८८

मताधिक्य: ८९ हजार ७९१

वर्ष २००९ विधानसभा निवडणूक

मतदानाची टक्केवारी: ६८ टक्के

विजयी उमेदवार: अजित पवार

विजयी मतं: १ लाख २८ हजार ५४४

मताधिक्य: १ लाख २ हजार ७९७

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com