
New Delhi News : जसा जातीभेद तसाच रंगभेद... आजही एखाद्याला काळ्या रंगावरून हिणवले जाते. यातून कुणीच सुटलेलं नाही. नुकतेच देशातील एका प्रगत राज्याच्या मुख्य सचिवांना त्याचा अनुभव आला. केरळच्या मुख्य सचिव शारदा मुरलीधरन यांच्यावर काळ्या रंगावरून टीका करण्यात आली. मात्र, त्यानंतर मुख्य सचिवांनी दिलेल्या उत्तरानं टीकाकारांची तोंड बंद करून टाकली आहेत.
शारदा मुरलीधरन यांनी फेसबुकवर एक पोस्ट करत रंगभेदाच्या टीकेबाबत सांगितले आहे. तसेच त्यांनी या टीकेला जोरदार प्रत्युत्तरही दिले आहे. त्यांच्या काळा रंगाची तुलना त्यांच्या कामकाजाशी करण्यात आली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मुख्य सचिव म्हणून माझ्या कारभाराबद्दल एक टिप्पणी ऐकली. माझ्या पतीच्या गोऱ्या रंगाइतकीच ती काळी आहे, अशी ती टीका असल्याचे मुरलीधरन यांनी सांगितले. या टीकेला त्यांनीही अत्यंत मार्मिकपणे प्रत्युत्तर दिले आहे. शारदा यांचे पतीही मुख्य सचिव होते. त्यांच्याकडून शारदा यांनी पदभार स्वीकारत इतिहास घडवला आहे.
शारदा यांनी पुढे म्हटले आहे की, मला माझे काळे असणे स्वीकारावे लागेल. मी या विशिष्ट व्यक्तीला का बोलू इच्छिते? हो, मला वाईट वाटले. पण गेल्या सात महिन्यांत माझ्या आधीच्या अधिकाऱ्यांसोबत तुलना करण्याची मोहीम सुरू आहे. त्यामुळे मी अस्वस्थ आहे. काळी, असे लेबल लावण्यापर्यंत ती गेली. जणू काही ते अत्यंत लाजिरवाणे आहे.
काळा रंग हा काळा असतो, तो तसाच असतो. फक्त काळा रंगच नाही, तर काळा कधीही चांगले करत नाही, काळा हा अस्वस्थता, हुकूमशाही, गडद अंधाराचे प्रतिक मानले जाते. या रंगाला का बदनाम केले जाते. हा रंग एक विश्वव्यापी सत्य आहे. मानवजातीला ज्ञात असलेली सर्वात शक्तीशाली ऊर्जा आहे. तो काहीही शोषून घेऊ शकतो, असे मुख्य सचिवांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
काळा रंग प्रत्येक गोष्टीत आहे. ऑफिससाठीचा ड्रेस कोड, संध्याकाळच्या वातावरणातील चमक, काजळ, पावसासाठीचे आश्वासक वातावरण... असे शारदा यांनी म्हटले आहे. त्यांनी खाल्या रंगावरून आईला विचारलेल्या एका प्रश्नाचीही आठवण काढत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. चार वर्षांची असताना मी माझ्या आईला विचारले की, ती मला तिच्या गर्भाशयात परत ठेवू शकते का आणि मला गोरी करेल का?, असे शारदा यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे. त्यांनी पोस्टमध्ये आपल्या मुलांविषयी सांगताना काळा रंग ही सुंदरता असल्याचे म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.