New Kerala Chief Minister : राहुल गांधींच्या विश्वासातील दोन दिग्गजांना मागे टाकून मारली बाजी : केरळच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा जबरदस्त राजकीय प्रवास

New Kerala chief minister VD Satheesan biography : राहुल गांधींच्या जवळच्या दोन दिग्गज नेत्यांना मागे टाकत केरळच्या नव्या मुख्यमंत्र्यांनी राजकारणात मोठी झेप घेतली. जाणून घ्या त्यांचा संघर्षमय आणि प्रभावी राजकीय प्रवास.
New Kerala Chief Minister : राहुल गांधींच्या विश्वासातील दोन दिग्गजांना मागे टाकून मारली बाजी : केरळच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा जबरदस्त राजकीय प्रवास
Published on
Updated on

केरळच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत वीडी सतीशन यांची नेतेपदी निवड करण्यात आली असून आता ते राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. जवळपास 10 वर्षांनंतर पुन्हा सत्तेत आलेल्या काँग्रेसने सतीशन यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करत मोठा राजकीय संदेश दिला आहे.

विशेष म्हणजे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत राहुल गांधी यांच्या विश्वासातील अनेक मोठ्या नेत्यांची नावे चर्चेत होती. मात्र शांत, अभ्यासू आणि आक्रमक विरोधी नेता अशी ओळख निर्माण करणाऱ्या वीडी सतीशन यांनी अखेर बाजी मारली. केरळ विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी एक धाडसी विधान केले होते. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UDF आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले नाही, तर आपण राजकारणातून निवृत्ती घेऊ, असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला होता.

असा आहे त्यांचा राजकीय प्रवास..

31 मे 1964 रोजी एर्नाकुलम जिल्ह्यातील नेट्टूर येथे सतीशन यांचा जन्म झाला. विद्यार्थी चळवळीतून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली. महाराजा कॉलेज आणि गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना ते विद्यार्थी राजकारणात सक्रिय झाले. काँग्रेसची विद्यार्थी संघटना KSU मधून त्यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली. पुढे ते KSU चे राज्याध्यक्ष आणि भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिवही झाले.

New Kerala Chief Minister : राहुल गांधींच्या विश्वासातील दोन दिग्गजांना मागे टाकून मारली बाजी : केरळच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा जबरदस्त राजकीय प्रवास
Gokul controversy : धक्कादायक! थेट सुप्रीम कोर्टाच्या निकालातीलच शब्द वगळला : 'राज्य सरकारच्या' अधिकाऱ्याचा प्रताप; कारवाईच्या हालचाली सुरु

व्यवसायाने वकील असलेल्या सतीशन यांनी 1990 च्या दशकात पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली होती. सुरुवातीला पराभवाचा सामना करावा लागला, मात्र त्यांनी हार मानली नाही. 2001 मध्ये परवूर मतदारसंघातून त्यांनी पहिला विजय मिळवला. त्यानंतर 2006, 2011, 2016 आणि 2021 मध्ये सलग विजय मिळवत त्यांनी मजबूत जनाधार निर्माण केला.

New Kerala Chief Minister : राहुल गांधींच्या विश्वासातील दोन दिग्गजांना मागे टाकून मारली बाजी : केरळच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा जबरदस्त राजकीय प्रवास
Top 10 News : पुणे हादरले! हडपसरमध्ये आढळलेला तो बॉम्बच होता, तर आरपीआय नेत्याची निर्घृण हत्या; वाचा टॉप 10 घडामोडी !

केरळचे माजी मुख्यमंत्री के. करुणाकरन यांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे. संघटनात्मक कामकाज, अभ्यासू नेतृत्व आणि विधानसभेतील प्रभावी मांडणी यामुळे त्यांनी वेगळी छाप पाडली. सौर घोटाळा आणि बार लाच प्रकरणासारख्या मुद्द्यांवर त्यांनी सरकारला अडचणीत आणले होते.

2021 च्या निवडणुकीनंतर काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर पक्षाने बदलाचा निर्णय घेत सतीशन यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली. त्यानंतर त्यांनी आक्रमक भूमिका घेत काँग्रेसला पुन्हा उभारी देण्याचे काम केले. आता त्याच मेहनतीचे फळ म्हणून त्यांच्याकडे केरळच्या सत्तेची धुरा सोपवण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com