Mamata Banerjee : पोलिस आयुक्तांबाबत ममता बॅनर्जींचा मोठा गौप्यस्फोट; सरकार अडकले खिंडीत?

Vineet Kumar Goyal West Bengal Government : आरजी कर रुग्णालयातील रेप व मर्डरच्या घटनेनंतर कोलकाता पोलिसांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप होत आहे.
Mamata Banerjee, Vineet Kumar Goyal
Mamata Banerjee, Vineet Kumar GoyalSarkarnama
Published on
Updated on

Kolkata Police Commissioner : आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयातील ट्रेनी महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर कोलकाता पोलिस सध्या सर्वांच्या टार्गेटवर आहेत. या घटनेच्या तपास पोलिसांनी अक्षम्य निष्काळजीपणा केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता पोलिस आयुक्तांबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी गौप्यस्फोट केला आहे.

कोलकाताचे पोलिस आयुक्त विनित कुमार गोयल यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. प्रामुख्याने भाजपकडून ममतांसह गोयल यांच्या राजीनाम्यासाठी दबाव टाकला जात आहे. राज्यपालांनीही याबाबत थेट भाष्य केले आहे. रेप-मर्डरच्या घटनेनंतर कोलकाता पोलिसांबाबत रोष वाढला आहे. पक्षातील नेत्यांकडूनही आता टीका होऊ लागल्याने ममता सरकार खिंडीत अडकल्याचे चित्र आहे.

Mamata Banerjee, Vineet Kumar Goyal
Assembly Election 2024 : जेलमधून केजरीवालांच्या निरोपाने राहुल गांधींची रणनीती फसणार; काय घडतंय आप-काँग्रेसमध्ये?

यापार्श्वभूमीवर ममतादीदींनी सोमवारी मोठा खुलासा केला. त्या म्हणाल्या, ‘मागील आठवड्यात कोलकाता पोलिस आयुक्त माझ्याकडे राजीनामा घेऊन आले होते. पण दुर्गा पूजेचा उत्सव जवळ आला आहे. कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीमुळे मी त्यांना रोखले.’

राज्याच्या सचिवालयात सोमवारी ममतांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत बोलत असताना त्यांनी आयुक्तांबाबत हा खुलासा केला आहे. बैठकीत अधिकाऱ्यांना सुचना करताना त्यांनी सांगितले की, आता दुर्गा पूजेचा काळ असल्याने आपल्याला सतर्क राहायला हवे. हा सण सर्वांचा आहे. आपल्यासाठी दुर्गा पूजा सर्वात मोठा सण आहे.

Mamata Banerjee, Vineet Kumar Goyal
Health Insurance : नितीन गडकरींची नाराजी आज दूर होणार का? सर्वसामान्यांना होईल मोठा फायदा

उत्सवाच्या काळात बंगालला बदनाम करण्याचे कोणतेही षडयंत्र व्हायला नको. काही टीव्ही चॅनेल टीआरपीसाठी लोकांना भडकवत आहेत. काही लोक राज्यात आग लावू पाहत असल्याचेही ममतांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत म्हटले आहे.

काही टीव्ही चॅनेल सातत्याने बंगालच्या लोकांचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहेत. बंगालचे लोक वर्षभर या सणाची वाट पाहत असल्याचे ते विसरले आहेत. हा काळ मोठ्या व्यवसायाचाही आहे. काही लोक आपला बिझनेसही खराब करू पाहत आहेत, असा आरोप ममतांनी बैठकीत केला.  

दरम्यान, रेप-मर्डर केसचा तपास सीबीआयकडून सुरू आहे. तर ममता सरकारने नुकताच विधानसभेत अपराजिता हे विधेयक पारित केला आहे. त्यामध्ये रेप-हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्यावरून राज्यपाल आणि सरकार आमनेसामने उभे ठाकले आहे. सरकारने विधेयकाचा टेक्निकल रिपोर्ट दिला नसल्याने संमती दिली जाणार नाही, असे राजभवन स्पष्ट करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com