Assembly Election 2024 : जेलमधून केजरीवालांच्या निरोपाने राहुल गांधींची रणनीती फसणार; काय घडतंय आप-काँग्रेसमध्ये?

AAP Congress Haryana Election Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी मत विभाजन टाळण्यासाठी हरियाणामध्ये आपसोबत आघाडी करण्याबाबतचे संकेत नुकतेच दिले होते.
Rahul Gandhi, Arvind Kejriwal
Rahul Gandhi, Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये आघाडीच्या चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात होते. पण आघाडी होण्याआधीच बिघाडी झाल्याची चर्चा आहे. जागावाटपावर निर्णय होण्याआधीच काँग्रेसने 90 पैकी 42 उमेदवारही जाहीर केले आहेत. त्यामुळे आता आपने काँग्रेसला आघाडीचा निर्णयाबाबत डेडलाईन दिली आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सुचनेनंतर मागील आठवड्यात आपसोबत आघाडीच्या चर्चा सुरू झाल्या. राज्यात सत्ता काबीज करण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्रित आल्यास मतविभाजन टाळता येईल, अशी राहुल यांची रणनीती आहे. आघाडी झाल्यास भाजपला हरवणे सोपे जाईल, असे राहुल यांना वाटते.

Rahul Gandhi, Arvind Kejriwal
Rahul Gandhi : अमेरिकेत राहुल गांधींसमोरच सॅम पित्रोदांनी उच्चारला ‘पप्पू’ हा शब्द; नेमकं काय म्हणाले?

राहुल यांच्या इच्छेनुसार दोन्ही पक्षातील नेत्यांनी बोलणीही सुरू केली. पण काही जागांवरून घोडे अडले आहे. आपचे नेते व खासदार संजय सिंह यांनी सर्व जागांवर निवडणूक लढण्याची तयारी झाल्याचे विधान केले आहे. पक्षाचे सुप्रीमो अरविंद केजरीवाल यांच्या संमतीची वाट पाहत आहोत. त्यांनी हिरवा कंदील दाखवताच उमेदवारी यादी जाहीर केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आप हरियाणाचे प्रदेशाध्यक्ष सुशील गुप्ता यांनी काँग्रेसला सोमवारी सायंकाळपर्यंतची डेडलाईन दिली आहे. आम्ही 90 जागांची तयारी केली असून अद्याप हायकमांडकडून आघाडीबाबत काहीही निरोप नाही. आम्हाला आज निरोप आला नाही तर सायंकाळी यादी जाहीर केली जाईल, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले.

Rahul Gandhi, Arvind Kejriwal
Health Insurance : नितीन गडकरींची नाराजी आज दूर होणार का? सर्वसामान्यांना होईल मोठा फायदा

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरदी मुदत 12 सप्टेंबर आहे. काँग्रेसने आतापर्यंत 42 उमेदवार जाहीर केले आहेत.तर आपकडून एकाही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आपमधील इच्छुकांची धाकधुक वाढत चालली आहे. त्यातच आपचे खासदार राघव चड्ढा यांनीही 12 सप्टेंबर आधी आम्ही निर्णय घेऊ, असे म्हणत संभ्रम वाढवला आहे.

दुसरीकडे काँग्रेसचे नेते पवन खेडा यांनीही आपल्याकडे अजून तीन दिवस असल्याचे सांगत आघाडीच्या आशा जिवंत असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे जेलमधून केजरीवाल काय निरोप देणार आणि आपची यादी आज जाहीर होणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com