New Delhi : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जीएसटी कौन्सिलची 54 वी बैठक होणार आहे. यामध्ये जीवन विमा आणि आरोग्य विम्यावरील जीएसटीबाबत महत्वाचा निर्णय होऊ शकतो. विम्यावरील जीएसटी कमी करण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही केली होती.
सध्या विम्याच्या प्रिमीयमवर 18 टक्के जीएसटी द्यावा लागतो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा भूर्दंड सोसावा लागत आहे. नितीन गडकरी यांनीही अर्थमंत्र्यांना पत्राद्वारे जीएसटी हटवण्याची मागणी केली होती. त्यांनी जुलै महिन्यात पत्र लिहिले होते. सर्वच विरोधी पक्षांनीही यावरून पावसाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरले होते.
आयुष्यातील अनिश्चिततांवर कर लावण्यासारखा हा प्रकार असल्याची नाराजी गडकरी यांनी पत्रात व्यक्त केली होती. नागपूर मंडल जीनव विमान निगम कर्मचारी संघाने गडकरी यांच्याकडे जीएसटी हटवण्याबाबत मागणी केली होती.
आज होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत गडकरी यांच्या मागणी मान्य झाल्यास जीवन व आरोग्य विमा स्वस्त होईल. सध्या विम्यावरील जीएसटीमुळे प्रीमीयम मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे अनेकदा सर्वसामान्य नागरिक त्यापासून दूर राहतात.
प्रीमीयम कमी झाल्यास विमाधारकांची संख्या वाढू शकते. मात्र, सरकारने जीएसटी कमी केल्यास कंपन्यांकडून त्याचा फायदा ग्राहकांना दिला जाणार का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, विम्यावरील जीएसटी पाच टक्क्यांपर्यंत कमी केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.