Jaya Bachchan : जया बच्चन एकनाथ शिंदेंवर भडकल्या; म्हणाल्या, ...हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान नाही का?

उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ जया बच्चनही कामराच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्या आहेत.
Eknath Shinde, Jaya Bachchan
Eknath Shinde, Jaya BachchanSarkarnama
Published on
Updated on

Kunal Kamra Row : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयीच्या विधानामुळे मोठ वाद निर्माण झाला आहे. सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी कामराला धडा शिकवण्याची भाषा सुरू केली आहे. तर उद्धव ठाकरेंसह इतर विरोधकांनी कामराची पाठराखण करताना संविधानाची आठवण करून दिली जात आहे. या वादावर आता समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी भाष्य केले आहे.

उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ जया बच्चनही कामराच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्या आहेत. कामराला विरोध म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला असल्याचे त्या म्हणाल्या आहेत. संसदेच्या आवारात माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, बोलण्याचे स्वातंत्र्य कुठे आहे? जेव्हा हंगामा होतो, तेव्हा कारवाईचे स्वातंत्र्य असते.

Eknath Shinde, Jaya Bachchan
Parliament Session Live : संकटमोचकामुळेच काँग्रेस बॅकफुटवर; संसदेत जोरदार हंगामा, नड्डा, रिजिजू तुटून पडले...

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून कामरा यांचा कार्यक्रम झालेल्या हॉटेलमध्ये तोडफोड करण्यात आली आहे. त्यावरूनही जया बच्चन संतापल्या. तुम्ही (एकनाथ शिंदे) तुमचा खरा पक्ष सोडून सत्तेसाठी दुसरा पक्ष बनवला. हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान नाही का?, असा सवाल जया बच्चन यांनी केला आहे. कामरा याने एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या भूमिकेवर केलेल्या कवितेत गद्दार हा शब्द वापरल्याने वाद निर्माण झाला आहे.

उद्धव ठाकरेंनीही मीडियाशी बोलताना कामराचे समर्थन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘कुणाल कामरा याने सत्य मांडले आहे. सत्य बोलणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला होऊ शकत नाही. शिंदे गद्दार आहेत, हे आम्ही उघड उघडपणे म्हणत आहोत.’ खासदार अरविंद सावंत यांनीही कामरा जे बोलला त्यातील प्रत्येक शब्द योग्य असल्याचे म्हटले आहे.

Eknath Shinde, Jaya Bachchan
Pawar Vs Thackeray : विधानसभेत सगळेच खोके म्हणणाऱ्या राज ठाकरेंना अजित पवारांनी डिवचले; म्हणाले, 'कधी निवडणूक...'

विरोधी पक्षातील सर्व लोक एकनाथ शिंदेंवर तोच आरोप करत आहे. कामरा यांनी तेच कवितेच्या रुपातून बोलून दाखवले. या देशात लोकशाही आहे, असे आपण म्हणत असू तर मग आपल्याला हे सर्व स्वीकारायला हवे, असेही सावंत म्हणाले.

काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही राज्य सरकारवर टीका केली. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था राहिलेली नाही. लोक घाबरून महाराष्ट्र सोडून चालले आहेत. राज्यात शांतता असायला हवी, असे सरकार म्हणते. पण तेच तोडफोड करतात, असे पटोले म्हणाले.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com