Kunal Kamra Update News : ‘’… तर, ते देशावर, लोकांवर अन् स्वत:च्या मुलांवर उपकार करतील’’ ; कुणाल कामराचं आणखी एक ट्वीट चर्चेत!

Kunal Kamra latest tweet : जाणून घ्या, कॉमेडियन कुणाल कामराने आता कोणाला केलंय टार्गेट अन् नेमकं काय म्हटलं आहे?
Kunal Kamra
Kunal Kamrasarkarnama
Published on
Updated on

Kunal Kamra on mainstream media : सध्या महाराष्ट्रात कॉमेडियन कुणाल कामराने राजकीय वातावरण चांगलंच तापवलेलं आहे. विशेषकरून सत्ताधाऱ्यांवर कामराचा निशाणा दिसत आहे. तर विरोधी पक्षातील विशेषता ठाकरे गटातील नेते कामराचे समर्थन करत आहेत. अशातच आता कुणाल कामराने मुख्य प्रवाहातील माध्यमांनाही फटकारले आहे.

कुणाल कामराने(Kunal Kamra) त्याच्या नवीन ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ‘’कोट शोधणाऱ्या सर्वांना – सध्या मेनस्ट्रीम मीडिया सत्ताधारी पक्षासाठी चुकीची माहिती पसरवण्याचे माध्यम बनली आहे. ही गिधाडं आहेत जी देशासाठी महत्त्वाच्या नसलेल्या मुद्य्यावर वृत्तांकन करत आहेत. जर या सर्वांनी उद्यापासून आपली दुकानं बंद केली तर, ते देशावर, लोकांवर आणि स्वत:च्या मुलांवर उपकार करतील.’’ असं म्हणत कुणाल कामराने मुख्य प्रवाहातील माध्यमांना फटकारले आहे.’’

Kunal Kamra
Kunal Kamra latest update : शिवसेनेच्या टार्गेटवर आलेल्या कुणाल कामराचे ‘MNS’च्या बड्या नेत्याने मानले जाहीर आभार, म्हटले...

विशेष म्हणजे कुणाल कामराच्या भूमिकेला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे(MNS) माजी आमदार आणि नेते राजू पाटील यांनीही ट्वीट करून कुणाल कामराला धन्यवाद दिले आहे. शिवाय, त्याचा एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये कामराने नागरी समस्यांवरून सरकारवर निशाणा साधलेला दिसत आहे.

Kunal Kamra
Kangana Ranaut on Kunal Kamra : कुणाल कामराच्या एकनाथ शिंदेंवरील टिप्पणीवर कंगना रनौतची 'रोखठोक' प्रतिक्रिया, म्हटले...

तर, कुणाल कामराविरोधात शिवसैनिकांमध्ये प्रचंड रोष असून शिवसेनेकडून कामराविरुद्ध अनेक ठिकाणी पोलिसांत तक्रार दाखल केली जात आहे. एवढच नाहीतर आता थेट शिवसेनेचे प्रमुख मंत्री शंभुराज देसाई यांनीही कुणाल कामराला शिवसेना स्टाईलने धडा शिकवणार असल्याचा कडक इशारा दिलेला आहे.

तर याआधी प्रसिद्ध अभिनेत्री अन् हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघाच्या भाजप खासदार कंगना रनौत(Kangana Ranaut) यांनीही कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या काव्यात्मक वादग्रस्त टिप्पणीवरून निर्माण झालेल्या वादंगानंतर प्रतिक्रिया देत कुणाल कामरावर टीका केलेली आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com