Lahore Airport Blast : पाकिस्तान हादरला! लाहौरमधील विमानतळावर तीन स्फोट, मिसाईल हल्ल्याचा प्रत्यक्षदर्शीकडून दावा

Three Explosions at Lahore Airport: लहारौमध्ये झालेल्या स्फोटानंतर प्रत्यक्षदर्शीने सांगितेली एअरपोर्टवर मिसाईलने हल्ला करण्यात आला.
Scene of chaos at Lahore airport after three consecutive blasts shook Pakistan, leaving passengers and staff in panic
Scene of chaos at Lahore airport after three consecutive blasts shook Pakistan, leaving passengers and staff in panic Sarkarnama
Published on
Updated on

Operation Sindoor Update : भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे. मंगळवारी रात्री अवघ्या 25 मिनिटांमध्ये भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून दहशतवाद्यांची अड्डे नष्ट केल्या. या कारवाईतून पाकिस्तान सावरताना दिसत नाही. तोच लाहोर विमानतळावर तीन मोठे स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.

लाहोरमधील वाॅल्टन विमानतळावर झालेल्या स्फोटाचा आवाज येवढा मोठा होता की अजुबाजुच्या गोपालनगर आणि नसराबाद भागात आवाज ऐकु आल्याचे सांगितले जाते आहे. स्फोटानंतर पाकिस्तानच्या अग्निशमन दलाकाडून मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले की एकामागून एक तीन स्फोट झाले त्यामुळे मोठा गोंधळ उडाला.

Scene of chaos at Lahore airport after three consecutive blasts shook Pakistan, leaving passengers and staff in panic
Operation Sindoor India :पाकिस्तानात एअर स्ट्राईक कसा झाला? कोणत्या शस्त्रांचा वापर करण्यात आला? ऑपरेशन सिंदूरचे महत्वाचे मुद्दे

स्फोट नव्हे मिसाईलने हल्ला

लहारौमध्ये झालेल्या स्फोटानंतर प्रत्यक्षदर्शीने सांगितेली एअरपोर्टवर मिसाईलने हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर एअरपोर्टवर सायरनचा आवाज ऐकायला आला. त्यानंतर हा आवाज लगेच बंद करण्यात आला. त्यामुळे काय झाले ते समजले नाही तसेच विमानतळ देखील बंद करण्यात आले.

पाकिस्तान लष्कराकडून स्फोट?

लाहौरमध्ये झालेल्या स्फोटाबद्दल एका हिंदी चॅनलने सुत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे की, लाहौरमध्ये पाकिस्तानच्या लष्कर सराव करत होते. या सरावाच्या दरम्यान लाहौर एअरपोर्ट जवळ स्फोट झाला. चुकून पाकिस्तानी लष्कराने आपल्याच शहरात स्फोट केला.

स्थानिक घाबरले

भारताने एअर स्ट्राईक करून पाकिस्तानच्या 9 ठिकाणांवर हल्ला केला. या हल्ल्यामुळे पाकिस्तानामध्ये आधीच घबराट पसरली आहे. त्यात लाहौरमध्ये झालेल्या स्फोटाने लाहौरमधील नागरिक अधिक घाबरल्याची माहिती आहे. भारतीय लष्कराकडून ही कारवाई केल्याची शंका काही जण उपस्थित करत होते. मात्र, भारतीय लष्कराकडून अधिकृतरित्या याबाबत काही सांगण्यात आलेले नाही.

Scene of chaos at Lahore airport after three consecutive blasts shook Pakistan, leaving passengers and staff in panic
Jayant Patil, Vishwajeet Kadam : जयंत पाटील, विश्वजीत कदमांची वाढलीय 'धडधड' : महाविकास आघाडीपुढे कमबॅकच आव्हान!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com