Jayant Patil, Vishwajeet Kadam : जयंत पाटील, विश्वजीत कदमांची वाढलीय 'धडधड' : महाविकास आघाडीपुढे कमबॅकच आव्हान!

Sangli ZP : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या असा आदेश थेट सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
Sangli ZP Jayant Patil And  Vishwajeet Kadam
Sangli ZP Jayant Patil And Vishwajeet Kadamsarkarnama
Published on
Updated on

Sangli News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या असा आदेश थेट सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच 2022 पूर्वीची स्थिती कायम ठेवत या निवडणुका घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. यामुळे स्थानिकसाठी आरक्षण बदण्याची शक्यता आहे. तर आता न्यायालयाच्या आलेल्या आदेशामुळे गेल्या तीन वर्षापासून स्थानिकवर असलेले प्रशासक राज संपणार आहे. एकीकडे इच्छुकांच्या गुडघ्याला असणारे बाशिंग आता डोक्यावर येणार आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांची 'धडधड' वाढली आहे. या दोघांच्या समोर जिल्हा परिषदेत सत्ता हस्तगत करण्याचे आव्हान असणार आहे. तसेच महाविकास आघाडीतील नेत्यांनाही गटतट विसरून स्थानिकसाठी एकत्र यावे लागणार आहे.

लोकसभेवेळी सांगली जिल्ह्यात मोठ्या घडामोडी झाल्या. येथे महाविकास आघाडीने शिवसेनेकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. मात्र बंडखोरी करत विशाल पाटील यांनी मैदानात उडी घेतली. यामुळे काँग्रेसपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. सांगली जिल्ह्याचे नेते अशी ओळख असणाऱ्या डॉ. विश्वजीत कदम यांनी शरिराने चंद्रहार पाटलांचा प्रचार केला. मात्र विशाल पाटील यांच्या गुलालासाठी तगडी फिल्डींग लावली. यामुळेच विशाल पाटलांनी गड राखला. ते खासदार झाले. त्यांनी पुढे काँग्रेसला पाठिंबा दिल्याने सांगलीची जागा महाविकास आघाडीच्या परड्यात पडली. मात्र येथूनच महाविकास आघाडीत फूट पडण्यास सुरूवात झाली. जिल्ह्यात गटांचा वारू सुसाट सुटला आहे.

नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यात महायुतीने पाच जागा पटकावत पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. 2014 च्या निवडणुकीत असेच यश महायुतीला (Mahayuti) मिळाले होते. त्यावेळी भाजपने चार आणि शिवसेनेने एक जागा जिंकली होती. त्याची पुनरावृत्ती 2024 च्या निवडणुकीत पुन्हा झाली. फक्त पुनरावृत्तीच झाली नाही तर जिल्ह्यातील दोन मोठ्या नेत्यांना स्वत:चे लिडही वाचवता आले नाही.

Sangli ZP Jayant Patil And  Vishwajeet Kadam
Jayant Patil : जयंत पाटलांनी स्थानिकसाठी दंड थोपटले!, युवक जिल्हाध्यक्षपदासह निरीक्षकांच्या नियुक्त्या करत भाकरी फिरवली

जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासह विश्वजीत कदम यांचे मताधिक्य कमालीचे कमी झाले. यामुळे आता या दोघांसमोर जिल्हा परिषदेत सत्ता आणण्याचे आव्हाण असणार आहे. तर महायुतीचे लक्ष्य आपली सत्ता आपल्याचकडे ठेवण्याचे असणार आहे. जयंत पाटील यांच्यासमोर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांचे आव्हान असणार आहे. त्यांच्या प्रवेशामुळे शिराळा तालुक्यात राजकीय समीकरणांना गती आली जयंत पाटील यांच्याविरोधात महायुतीला मोठी ताकद मिळाली आहे.

शिराळा आणि वाळवा तालुक्यातील 48 गावांच्या मतदारसंघावर जिल्हा परिषदेचे कासेगाव, वाटेगाव, पेठ, येलूर, कामेरी आणि तांदुळवाडी असे पाच गट आहेत. तर पंचायत समितीत 10 (गन) येतात. येथे मानसिंगराव नाईक यांच्यासह जयंत पाटील यांना फटका बसण्याची स्थिती आहे. गेल्या वेळी दोन गट जयंत पाटील यांच्याकडे होते. तर 3 विरोधकांकडे. पण पंचायत समितीत जयंत पाटील यांचा वरचष्मा राहीला होता.

मात्र आता सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक, आ. सदाभाऊ खोत यांच्यासह माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांना थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ताकद मिळणार आहे. भाजपकडूनही चंद्रकांत पाटील यांच्यामाध्यमातून सम्राट महाडिक आणि सत्यजित देशमुख यांना रसद पूरवली जाणार आहे. यामुळे जयंत पाटील यांच्यासह मानसिंगराव नाईक यांना ही जिल्हा परिषदेसह पंचायत समितीची निवडणुकीचा पेपर सोपा असणार नाही.

Sangli ZP Jayant Patil And  Vishwajeet Kadam
Jayant Patil News : निवडणुका जिंकण्यासाठी विचार न करता आश्वासनं, आता राज्यावर कर्जाचा डोंगर!

पलूस कडेगाव मतदार संघात येणारे जिल्हा परिषदेचे 4 गट आणि 8 पंचायत समितीच्या गन आहेत. त्यापैकी गेल्या पलूस आणि कडेगाव भाजपच्या ताब्यात होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी-भाजप युती होती. पण आता परिस्थिती वेगळी असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विधान परिषदेचे आमदार अरुण लाड सध्या महाविकास आघाडीबरोबर आहेत. यामुळे पलूस कडेगाव मतदार संघात डॉ. विश्वजीत कदम यांच्याबाजूने राजकीय समिकरण जुळत आहेत. यामुळे येथेही भाजपला रणनीती आखावी लागणार आहे.

(विस्तृत माहिती : डी. डी. पाटील, बलराज पवार, शांताराम पाटील, धर्मवीर पाटील आणि संजय गणेशकर सकाळ सांगली)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com