

Lionel Messi Issue at West Bengal : अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी नुकताच भारत दौऱ्यावर येऊन गेला. आपल्या दौऱ्यात त्यानं कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि नवी दिल्ली या शहरांना भेटी दिल्या. गोट इंडिया टूर २०२५ असं त्याच्या दौऱ्याचं नाव होतं. विविध कार्यक्रम आणि इव्हेंटसाठी त्यानं या भेटी दिल्या. पण मेस्सीचा हा दौरा भारतातल्या एका मंत्र्याला चांगलाच महागात पडला आहे. संबंधित मंत्र्याला चक्क आपलं मंत्रिपदच गमवावं लागलं.
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता इथल्या सॉल्ट लेक सीटी फुटबॉल स्टेडियममध्ये लिओनेल मेस्सीच्या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. १३ डिसेंबर २०२५ रोजी हा कार्यक्रम पार पडला, पण तो सुरळीत झाला नाही. तर त्याला गालबोट लागलं, म्हणजे मेस्सी स्टेडियममध्ये दाखल झाला पण अगदीच १० मिनिटांतच तो तिथून बाहेर पडला. पण त्याची एक झलक पाहण्यासाठी किंवा चाहत्यांनी त्याच्या भेटीसाठी तब्बल हजारो रुपयांची तिकीटं काढून या स्टेडियममध्ये हजेरी लावली आणि मेस्सीनं त्याच्याशी संवाद न साधताच तो काही क्षणातच बाहेर पडला. यामुळं चिडलेल्या चाहत्यांनी स्टेडियममधील खुर्च्यांची तोडफोड करत चांगलाच धुडगूस घातला.
यामुळं अखेर सुरक्षा रक्षकांना गोंधळ घालणाऱ्यांवर लाठीचार्ज करावा लागला होता, तसंच तिथं चेंगराचेंगरीची परिस्थिती देखील निर्माण झाली होती. या ढिसाळ नियोजनामुळं पश्चिम बंगाल सरकारवर नामुष्की ओढवली. त्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या सर्व प्रकाराला कोण जबाबदार आहे? याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर तात्काळ पश्चिम बंगालचे क्रिडा मंत्री अरुप बिस्वास यांना आपल्या पदाचा राजीनामा दिला.
मंत्री बिस्वास यांनी मुख्यमंत्री बॅनर्जी यांना सोमवारी लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, "मेस्सीच्या कोलकाताच्या दौऱ्यावेळी जो गोंधळ झाला त्याच्या चौकशीसाठी आपण चौकशी समिती नेमली आहे. त्यामुळं या चौकशीत कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये किंवा ती एकतर्फी होऊ नये यासाठी मी माझ्या क्रिडा मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे. त्यामुळं आपण माझा राजीनामा स्विकार करावा, अशी मी विनंती करतो" असं पत्र बिस्वास यांनी मुख्यमंत्री बॅनर्जी यांना लिहिलं आहे.
सुत्रांच्या हवाल्यानं इंडियन एक्स्प्रेसनं आपल्या वृत्तात म्हटलं की, मुख्यमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या अत्यंत चिडल्या आहेत. सोमवारी गंगासागर मेळाव्याच्या तयारीचा आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा आपल्या कॅबिनेट सहकाऱ्यांच्या आणि विभागीय सचिवांना झापलं. तसंच त्यांनी स्थानिक मंत्र्यांना सल्ला दिला की, "हाय प्रोफाईल कार्यक्रमांमध्ये व्हीव्हीआयपीचा वावर असतो तेव्हा तुम्ही कायम अलर्ट मोडवर असणं गरजेचं आहे"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.