Nitish Kumar: नितिश कुमारांनी महिलेच्या चेहऱ्यावरचा हिजाब खेचला! व्हिडिओ व्हायरल, लाजिरवाण्या कृत्याचा होतोय निषेध

Nitish Kumar Hijab Controversy: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे अधुनमधून विचित्र घटनांसाठी चर्चेत येत असतात. पुन्हा एकदा अशाच एका घटनेसाठी ते चर्चेत आले असून त्यांच्या कृत्याचा सर्वत्र निषेध होत आहे.
Nitish Kumar Pulled Hijab of a women
Nitish Kumar Pulled Hijab of a women
Published on
Updated on

Nitish Kumar Hijab Controversy: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे अधुनमधून विचित्र घटनांसाठी चर्चेत येत असतात. पुन्हा एकदा अशाच एका घटनेसाठी ते चर्चेत आले असून त्यांच्या कृत्याचा सर्वत्र निषेध होत आहे. दंगलफेम माजी अभिनेत्री झायरा वसीम हिनं या प्रकारावरुन नितीश कुमार यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर सोशल मीडियातून देखील युजर्स नितीश कुमारांच्या कृत्याचा समाचार घेत आहेत.

Nitish Kumar Pulled Hijab of a women
Sharad Pawar NCP : महापालिका निवडणुका जाहीर होताच दिल्लीत मोठी घडामोड; शरद पवारांच्या पक्षाचे 5 खासदार शहांकडे, कारण आले समोर

नेमकं काय घडलंय?

बिहारमध्ये एका सरकारी कार्यक्रमात मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते काही प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली. एका मुस्लिम डॉक्टर महिलेला देखील पुरस्कार मिळाला, हा पुरस्कार स्विकारण्यासाठी ही महिला व्यासपीठावर गेलेली असताना मुख्यमंत्र्यांनी आपल्यानं हातानं तिला हा पुरस्कार दिला. पण त्याचवेळी त्यांनी या महिलेचा हजाब (चेहरा झाकण्यासाठी वापलं जाणार वस्र) जोरात खेचला. यामुळं संबंधित महिलेला अपमानास्पद परिस्थितीला सामोरं जावं लागलं. नितीश कुमारांच्या या कृत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरुन सोशल मीडियात सध्या धुमाकूळ सुरु आहे.

Nitish Kumar Pulled Hijab of a women
PCMC Election : एका भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीची झोपच उडाली : अजितदादांनी स्वतः मैदानात उतरून लावली यंत्रणा

विरोधक म्हणतात मुख्यमंत्र्यांची कृती लाजीरवाणी

या प्रकरणामुळं आता नितीश कुमार हे राजकीय टीकेचे धनी देखील झाले आहेत. काँग्रेससह अनेक विरोधीपक्षांनी मुख्यमंत्र्यांच्या या कृतीला लाजीरवाणं म्हटलं आहे. आरजेडीनं प्रश्न उपस्थित केला की, मुख्यमंत्र्यांना आपलं वागणं आणि जबाबदाऱ्यांची जाणीव आहे का? सोशल मीडियावर देखील मोठ्या संख्येनं लोक या महिलेच्या समर्थनार्थ बोलत आहेत. तसंच सत्तेचा हा दुरुपयोग असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Nitish Kumar Pulled Hijab of a women
NCP Politics : दोन्ही राष्ट्रवादीची युती कन्फर्म! अजितदादांच्या शिलेदाराची अमित शाहांशी चर्चा : दिल्लीतून ग्रीन सिग्नल

झायरा वसीमची सडकून टीका

हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर माजी अभिनेत्री झायरा वसीम हीनं नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी या महिलेचा आत्मसन्मान आणि खासगी मर्यादेचं उल्लंघन केलं आहे. तिनं म्हटलं की, कोणत्याही पदाला किंवा सत्तेला हा अधिकार नाही की त्यांनी कुठल्याही महिलेच्या धार्मिक आणि वैयक्तिक मर्यादेशी खेळावं. एका मुस्लिम महिलेच्या अनुषंगानं हे दृश्य पाहणं माझ्यासाठी अत्यंत दुःखद आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com