Mamata Banerjee : लोकसभा उपाध्यक्षपदासाठी ममतांची खेळी; 'हे' नाव सुचवत दिला काँग्रेसला झटका...

Lok Sabha Deputy Speaker Congress Awadhesh Prasad : लोकसभा उपाध्यक्षपदावरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एनडीए विरुध्द इंडिया आघाडी असा सामना झाला होता.
Mamata Banerjee
Mamata BanerjeeSarkarnama

New Delhi : लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने परस्पर उमेदवार दिल्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री नाराज झाल्या होत्या. आता त्यांनी लोकसभा उपाध्यक्षपदावरून काँग्रेसला मोठा झटका दिला आहे. ममतांनीही इंडिया आघाडीतील घटकपक्षांशी चर्चा न करता या पदाबाबत थेट केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.

ममता बॅनर्जी यांनी राजनाथ सिंह यांच्या फोनवरून संवाद झाल्याचे समजते. त्यांनी उपाध्यक्षपदासाठी समाजवादी पक्षाचे अयोध्येतील खासदार अवधेश प्रसाद यांच्या नावाचा प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे. हे पद विरोधकांना देण्याची आतापर्यंतची परंपरा आहे. त्यामुळे काँग्रेसला हे पद मिळेल, अशी अपेक्षा आहे.

Mamata Banerjee
New Criminal Laws : सोमवारपासून IPC होणार इतिहासजमा; तीन नवीन फौजदारी कायदे येणार...

अवधेश प्रसाद यांच्या नावाचा प्रस्ताव भाजपसाठी कठीण असल्याचे बोलले जात आहे. कारण ते निवडून आलेल्या फैजाबाद मतदारसंघातच अयोध्या आहे. तर ममतांनी बिगर काँग्रेसी खासदाराचा प्रस्ताव दिल्याने काँग्रेससाठी हा झटका मानला जात आहे.

दरम्यान, विरोधकांनी आपल्याला उपाध्यक्षपद मिळावे, असा आग्रह धरला आहे. तर एनडीए सरकार मात्र निवडणुकीच्या मूडमध्ये आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी मागील ५० वर्षात यावेळी पहिल्यांदाच निवडणूक झाली. त्यामुळे भाजपही नाराज आहे. परिणामी, उपाध्यक्षपदासाठीही निवडणूक होईल, अशीही चर्चा आहे.

Mamata Banerjee
Prashant Kishor on Nitish Kumar : विधानसभा निवडणुकीनंतर नितीश कुमार..! प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी

कोण आहेत अवधेश प्रसाद?

फैजाबाद मतदारसंघाचे खासदार बनण्याआधी अवधेश प्रसाद हे मिल्कीपुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. अनेक वर्षांपासून ते सपाशी जोडले गेले आहेत. मुलायमसिंह यादव यांचे विश्वासू नेते म्हणून त्यांची ओळख आहे. पहिली निवडणूक त्यांनी 1977 मध्ये जनता पक्षाकडून जिंकली होती. आतापर्यंत आठवेळी त्यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली आहे. तर 2024 मध्ये पहिल्यांदाच ते लोकसभेत पोहचले.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com