Andhra Pradesh News : आंध्र प्रदेशात लोकसभेसह (Lok Sabha Election 2024) विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे. मात्र, ही निवडणूक पहिल्यांदाच सर्वच राजकीय पक्षांसाठी विशेष ठरणार आहे. या वेळी पहिल्यांदाच रेड्डी कुटुंब एकमेकांविरोधात उभे ठाकले आहे. राज्याचे मुख्यमंत्री व वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्या भगिनी आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष वाय. एस. शर्मिला रेड्डी हे राजकीय वैरी बनले आहेत. तर दुसरीकडे भाजपने टीडीपीसोबत आघाडी करत निवडणुकीत चुरस वाढवली आहे.
जगनमोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांनी गुरुवारी सर्वच विरोधकांवर हल्लाबोल केला. या वेळी बोलताना त्यांनी तेलगू देसम पार्टी, जन सेवा पार्टी, भाजप आणि काँग्रेसवर (Congress) टीका केली. या सर्व पक्षांनी एकत्रित आपल्याविरोधात युद्ध पुकारले आहे, असे ते म्हणाले. भाजप, टीडीपी आणि जनसेवा यांची आघाडीमध्ये एक षडयंत्र असल्याचा निशाणा त्यांनी साधला.
टीडीपी आणि जनसेवा पक्षाने मदसाठी दिल्लीतून एक पक्ष (BJP) आणला. त्यानंतर त्यांनी अप्रत्यक्षपणे (काँग्रेस) आणखी एक पक्ष आणला. हे सर्वजण मिळून एका जगनविरोधात लढत आहेत. हेही पुरेसे नसल्याने त्यांनी माझ्या दोघी बहिणींनाही आणले. आता हे सगळे एका व्यक्तीविरोधात उभे राहिले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मुख्यमंत्री रेड्डींनी बहीण वाय. एस. शर्मिला (YS Sharmila Reddy) आणि चुलत बहीण सुनीता रेड्डी यांच्यावर नाव न घेता टीका केली. ‘मी एकटा आहे. सगळे पक्ष माझ्याविरोधात एकत्र आले आहेत. मला फक्त जनता आणि देवाची मदत आहे. त्यामुळे विरोधकांना या निवडणुकीत धडा शिकवा,’ असे आवाहन जगनमोहन यांनी मतदारांना केले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.