Lok Sabha Election 2024 : 'एक्झिट, ओपिनियन पोल'बाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Exit And Opinion Polll News : याच काळात वेगवेगळ्या माध्यम संस्थांकडून निवडणुकांच्या एक्झिट पोल आणि ओपिनिअन पोलबाबत निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Election Commission
Election CommissionSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आता ऐन उन्हाळ्यातच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.महायुती व महाविकास आघाडीकडून अनेक जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. दुसरीकडे काही जागांवरून महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्षात रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान याच काळात वेगवेगळ्या माध्यम संस्थांकडून निवडणुकांच्या एक्झिट पोल आणि ओपिनिअन पोलबाबत निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

आगामी लोकसभा निवडणूक 2024 लक्षात घेता 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत एक्झिट पोलवर बंदी असेल. आपल्या आदेशानुसार, भारत निवडणूक आयोगाने 19 एप्रिल रोजी सकाळी 7 ते 1 जून रोजी संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. या कालावधीत सर्व लोकसभा मतदारसंघात एक्झिट पोलच्या निकालांचे प्रकाशन आणि प्रसारण करण्यास मनाई असेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजस्थानचे मुख्य निवडणूक अधिकारी प्रवीण गुप्ता यांनी सांगितले की, अधिसूचनेनुसार, एक्झिट पोल घेण्यावर आणि एक्झिट पोलचे निकाल वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित करण्यास किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे किंवा इतर कोणत्याही प्रकारे प्रसारित करण्यावर पूर्ण बंदी असेल.

निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, '19 एप्रिल ते 1 जून संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत देशात एक्झिट पोलचं (POll) प्रसारण आणि प्रकाशन करण्यास बंदी असणार आहे. मतदान संपेपर्यंत 48 तासांच्या कालावधीत इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये कोणत्याही ओपिनियन पोलचे अंदाज किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या मतदान सर्वेक्षणाच्या निकालांसह कोणतीही मतदानासंदर्भातील माहिती प्रदर्शित करण्यावर स्थगिती असेल."

उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्य निवडणूक अधिकारी नवदीप रिनवा यांनी सांगितले की, "या आदेशाचे उल्लंघन केल्यास दोन वर्षांचा तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे. मीडिया संस्थांना निवडणुकीच्या काळात मतदान आणि सर्वेक्षणाचे निकालाचे अंदाज प्रकाशित आणि प्रसारित करता येणार नाहीत. या कालावधीत कोणतीही व्यक्ती राज्यात कोणतेही ओपिनियन पोल घेणार नाही किंवा कोणत्याही ओपिनियन पोलचे निकालाचे अंदाज प्रकाशित किंवा प्रसारित करू शकणार नाही. सार्वत्रिक निवडणुकांच्या बाबतीत मतदानासाठी निश्चित केलेल्या वेळेच्या सुरुवातीपासून ते मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत हे निर्बंध कायम राहतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com