Lok Sabha Election 2024 : निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा मास्टरस्ट्रोक; मोठ्या पक्षाची साथ मिळणार?

BJP-BJD Alliance News : भाजप आणि बीजेडीमध्ये आघाडी होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असून, पुढील दोन-तीन दिवसांत त्यावर शिक्कामोर्तब होईल, अशी चर्चा आहे.
PM Narendra Modi, Navin Patnaik
PM Narendra Modi, Navin PatnaikSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) 400 हून अधिक जागा मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यासाठी एनडीएतील मित्रपक्षांना अधिक ताकद देण्याबरोबरच विरोधी गोटातील आणखी पक्षांना सोबत घेण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्याला यशही मिळताना दिसत असून, ओडिशातील सत्ताधारी बिजू जनता दलाला एनडीएमध्ये घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यावर पुढील दोन-तीन दिवसांतच शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.

भाजप (BJP) व बीजेडीमध्ये (BJD) जागावाटपावरून चर्चा सुरू असून, ती अंतिम टप्प्यात आल्याचेही सांगितले जात आहे. आज बीजेडी आमदार, खासदारांची तातडीने बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत भाजपसोबत आघाडीबाबतचा (BJP-BJD Alliance) निर्णय घेतला जाऊ शकतो.

PM Narendra Modi, Navin Patnaik
Lok Sabha Election 2024 : कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात बंडखोरीच्या तयारीत असलेल्या नेत्याला सात वर्षांची शिक्षा

ओडिशामध्ये बीजेडी पक्षाचे प्रमुख व मुख्यमंत्री नवीन पटनायक (Navin Patnaik) यांची एकहाती सत्ता आहे. मागील अनेक वर्षांपासून ते सर्व विरोधी पक्षांना धूळ चारत आहेत. आता त्यांनाच सोबत घेत भाजपने मास्टरस्ट्रोक मारला आहे. दोन्ही पक्षामध्ये आघाडी जवळपास निश्चित मानली जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

असा असेल फॉर्म्युला?

दोन्ही पक्षातील जागावाटपामध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपला 13 ते 14 जागा मिळू शकतात. तर बीजेडीच्या वाट्याला 7 ते 8 जागा येतील. दोघांमधील आघाडी विधानसभेच्या निवडणुकीतही (Assembly Election) कायम राहणार आहे. या निवडणुकीत बीजेडीला 95 ते 100 जागा तर भाजपला 46 ते 52 जागा मिळू शकतात. त्यामुळे राज्यात बीजेडीचा दबदबा कायम राहणार आहे.

दरम्यान, उत्तर भारतात भाजपसोबत जेडीयू वगळता इतर कोणत्याही मोठ्या पक्षाशी आघाडी नाही. आता बीजेडी यांच्यारूपाने भाजपला मोठ्या पक्षाची साथ मिळणार आहे. संसदेत बीजेडीच्या खासदारांनी विरोधकांपेक्षा सरकारलाच अधिक साथ दिली आहे. त्यामुळे हा पक्ष अधिकृतपणे एनडीएमध्ये नसला तरी भाजपशी छुपी मैत्री असल्याची टीका विरोधकांकडून केली जाते. आता ही छुपी मैत्री अधिकृतपणे समोर येणार असल्याचे दिसते.   

R

PM Narendra Modi, Navin Patnaik
Lok Sabha Election 2024 : ज्यांचा दोनदा पराभव केला त्याच चौधरींसाठी भाजपनं सत्यपाल सिंह यांना बसवलं घरी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com