Congress News : काँग्रेसला मोठा झटका; एकाचवेळी सहा माजी आमदारांसह 32 नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Lalchand Kataria News : लालचंद कटारिया हे अशोक गेहलोत यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. सचिन पायलट यांच्या समर्थक माजी आमदारानेही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
BJP, Congress
BJP, CongressSarkarnama
Published on
Updated on

Rajasthan News : मागील वर्षी विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर काही महिन्यांतच काँग्रेसला (Congress News ) मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन माजी मंत्री आणि चार माजी आमदारांसह 32 नेत्यांनी एकाचवेळी पक्षाला रामराम ठोकला आहे. या सर्वांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या कट्टर समर्थकांचा या नेत्यांमध्ये समावेश आहे.

राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत नेत्यांचा पक्षप्रवेश झाला. अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले लालचंद कटारिया, राजेंद्र यादव या बड्या नेत्यांनी काँग्रेसला धक्का दिला आहे. ते गेहलोत यांचे समर्थक मानले जात होते.

BJP, Congress
Lok Sabha Election 2024 : भाजपला धक्का; खासदाराचा पक्षाला रामराम, काँग्रेसमध्ये केला प्रवेश

माजी आमदार रिछपाल मिर्धा, खिलाडीलाल बैरवा, आलोक बेनीवाल, विजयपाल मिर्धा यांनीही भीजपमध्ये प्रवेश केला आहे. बैरवा हे सचिन पायलट (Sachin Pilot) यांचे कट्टर समर्थक होते. या नेत्यांसह अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर हा काँग्रेसला मोठा झटका मानला जात आहे. राजस्थानमध्ये लोकसभेच्या 25 जागा आहे. या सर्व जागा जिंकणार असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. मागील निवडणुकीत भाजपने सर्व जागा जिंकल्या होत्या. त्याची पुनरावृत्ती होईल, असा दावा भाजपचे नेते करत आहेत.

दुसरीकडे काँग्रेसमधून बाहेर जाणाऱ्या नेत्यांची लांबचलांब रीघ लागलेली आहे. विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर पक्षातील नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेक नेते भाजपमध्ये दाखल होत आहेत. त्याचा फटका लोकसभेला बसू शकतो. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नुकतीच राजस्थानमधून गुजरातमध्ये दाखल झाली आहे. त्यानंतर लगेच भाजपने संधी साधत काँग्रेस फोडली आहे.  

BJP, Congress
TMC Candidate List 2024 : TMC च्या 42 उमेदवारांचे रॅम्पवाॅक; युवा नेते अभिषेक बॅनर्जी यांचा मोदींच्या 'गॅरंटी' वर पलटवार !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com