Bharat Sevashram Sangh : ममतांनी प्रचारात काढला BSS चा मुद्दा; पंतप्रधान मोदी म्हणाले, धमकी दिली...

PM Narendra Modi : ममता बॅनर्जींकडून रामकृष्ण मिशन, इस्कॉन, भारत सेवा आश्रमातील लोकांना धमकी दिली जात असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. त्यामुळे नवा मुद्दा निवडणुकीच्या प्रचारात आला आहे.
Mamata Banerjee, PM Narendra Modi
Mamata Banerjee, PM Narendra ModiSarkarnama

West Bengal News : पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप केल जात आहे. त्यामध्ये आता भारत सेवाश्रम संघाचा (Bharat Sevashram Sangh) मुद्दा चर्चेला आला आहे. संघातील लोक भाजपचा प्रचार करत असल्याचा आरोप ममतांनी केला होता. त्यावरून पंतप्रधान मोदींनी जोरदार पलटवार केला आहे.

बंगालमध्ये भारत सेवाश्रम संघाची (BSS) स्थापना 1917 मध्ये संत आचार्य स्वामी प्रणवानंदजी महाराजांनी केली होती. स्वामी प्रणवानंदजी एक महान योगी, आचार्य, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांचा जन्म 1896 मध्ये बंगालमधील मदारीपूर जिल्ह्यात बाजितपूर गावांत झाला होता. (Lok Sabha Election 2024)

संघाचे कोलकाता (Kolkata) येथे मुख्यालय असून भारतासह देशात अनेक ठिकाणी शाखा आहेत. गरिबांना मदत करणे, नैसर्गिक आपत्तीत सेवा देणे, शिक्षण, सामाजिक कार्यात सहकार्य यांसह धार्मिक क्षेत्रातही ही संस्था काम करते. (Latest Political News)

Mamata Banerjee, PM Narendra Modi
Congress News : बंगालमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते ‘अधीर’; खर्गेंच्या फोटोला फासले काळे

ममतांनी (Mamata Banerjee) या संस्थेवर शनिवारी आरोप केले आहेत. भारत सेवाश्रम निवडणुकीत भाजपला मदत करत आहे. संघातील संतही भाजपचे काम करत आहेत. कार्तिक महाराज टीएमसीच्या कार्यकर्त्यांना धमकावत आहेत. पण आता मी त्यांना संत मानत नाही. ते आता राजकीय पक्षाचे समर्थन करत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ममतांच्या या आरोपांनंतर पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, राज्य सरकारने यावेळी सर्व मर्यादा पार केल्या आहेत. आज बंगालच्या मुख्यमंत्री इस्कॉन, रामकृष्ण मिशन आणि भारत सेवाश्रममधील सन्याशांना खुलेपणाने धमकी देत आहेत. या संस्थांचे लाखो अनुयायी जगभरात असून त्यांचा हेतू केवळ लोकांची मदत करणे हा आके. पण बंगाल सरकारने आज त्यांच्याकडे दाखवले. एवढी हिंमत केवळ आपल्या वोट बॅंकेसाठी करत असल्याची टीका मोदींनी केली.    

Mamata Banerjee, PM Narendra Modi
Uttar Pradesh News : राहुल गांधी- अखिलेश यादवांच्या उपस्थितीने जमाव अनियंत्रित ; चेंगराचेंगरीची शक्यतेने सभा रद्द...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com