Lok Sabha Election 2024 : शर्मिला, तारिक अन्वर यांना काँग्रेसचे तिकीट; अमेठी, रायबरेलीत कुणाला उमेदवारी?

Congress News : काँग्रेसच्या तिकिटावर शर्मिला या लोकसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला आहे.
Congress
CongressSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : काँग्रेसकडून आज लोकसभा (Lok Sabha Election 2024) उमेदवारांची आणखी एक यादी प्रसिद्ध केली. या यादीमध्ये आंध्र प्रदेश, ओडिशा, बिहार आणि पश्चिम बंगालमधील एकूण 17 लोकसभा मतदारसंघांतील उमेदवार आहेत. आंध्र प्रदेशातून पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या भगिनी वाय. एस. शर्मिला रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर ज्येष्ठ नेते तारिक अन्वर यांना बिहारमध्ये कटिहार मतदारसंघातून मैदानात उतरवण्यात आले आहे.  

काँग्रेसने (Congress) आज जाहीर केलेल्या यादीमध्ये उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेली या मतदारसंघाचा समावेश नाही. त्यामुळे या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. दोन्ही मतदारसंघ गांधी कुटुंबाचे पारंपरिक मतदारसंघ आहेत. रायबरेलीतून मागील निवडणुकीत सोनिया गांधी (Sonia Gandhi) निवडून आल्या, तर अमेठीतून राहुल गांधींचा पराभव झाला.

Congress
Delhi Liquor Scam Case : ‘आप’ला मोठा दिलासा; मोदी सरकारला भिडणाऱ्या नेत्याची तुरुंगातून होणार सुटका

आता रायबरेलीतही काँग्रेसच्या पराभवासाठी भाजपने (BJP) कंबर असली आहे. अद्याप भाजपकडून या मतदारसंघातून उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. अमेठीतून स्मृती इराणी मैदानात आहेत. राहुल गांधींना (Rahul Gandhi) यापूर्वीच केरळातील वायनाड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे ते अमेठीतून पुन्हा लढणार की नाही, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहाेचली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, आज जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये आंध्र प्रदेशातील पाच, बिहारमधील तीन, ओडिशातील आठ आणि बंगालमधील एका उमेदवाराचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या शर्मिला (YS Sharmila Reddy) यांना काँग्रेसने लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. त्यांना कडापा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यात शर्मिला आणि जगनमोहन हे भाऊ-बहीण एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

दार्जिलिंगमध्ये काँग्रेसकडून आव्हान

दार्जिलिंगमध्ये काँग्रेसने मुनीष तमांग यांना उमेदवारी दिली आहे. उत्तर बंगालमधील डोंगराळ भागात तमांग यांचे नाव सतत चर्चेत असते. भारतीय गोरखा परिसंघाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. गोरखालँड आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. काही दिवसांपूर्वीच ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. भाजपचे सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. आता काँग्रेसच्या तिकिटावर ते भाजपचे विद्यमान खासदार राजू बिष्ट यांना टक्कर देणार आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसला विजयाची आशा आहे.

R

Congress
Lok Sabha Election 2024 : बिहारमध्ये भाजपला धक्का; विद्यमान खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com