Lok Sabha election 2024 : तुमच्यावर कारवाई करू! निवडणूक आयोगाने काँग्रेस अध्यक्ष खर्गेंना फटकारले

Election Commission of India : मतदान झाल्यानंतर दोन-तीन दिवसांनी मतदानाची टक्केवारी जाहीर केली जात असल्याने अनेक नेत्यांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. त्यामध्ये खर्गेंचाही समावेश आहे.
Mallikarjun Kharge, Election Commission
Mallikarjun Kharge, Election CommissionSarkarnama

New Delhi News : लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha election 2024) तीन टप्पे पूर्ण झाले असून अद्याप चार टप्पे बाकी आहे. मात्र, तीन टप्प्यांमधील मतदानाच्या टक्केवारीवरून वाद निर्माण झाला आहे. मतदानाच्या दिवशीच टक्केवारी प्रसिध्द होत नसल्याने विरोधकांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेत गंभीर आरोप केले आहेत. टक्केवारी प्रसिध्द करण्यास दोन-तीन दिवसांपेक्षा अधिक कालावदी लागत असल्याने संभ्रम निर्माण होत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

काँग्रेस (Congress) अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनीही याअनुषंगाने आरोप केले होते. त्यावर आयोगाने आक्षेप घेतला आहे. आयोगाने म्हटले आहे की, काँग्रेस अध्यक्षांनी केलेले आरोप निराधार आहेत. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकीच्या संचलनादरम्यान भ्रम आणि चुकीची दिशा देण्याच्या आणि अडचणी निर्माण करण्याच्या उद्देशाने हे आरोप करण्यात आले आहेत. (Latest Political News)

Mallikarjun Kharge, Election Commission
Arvind Kejriwal : 21 दिवस, 3 राज्य, 4 टप्पे अन् 5 अटी; केजरीवाल गाजवणार मैदान

मतदानाच्या (Voting) टक्केवारीबाबत करण्यात आलेल्या आरोपांमुळे मतदारांच्या सहभागावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. राज्यांमधील मोठ्या निवडणूक यंत्रणेलाही निराश करू शकतात. मतदानावर थेट परिणाम करणाऱ्या विधानांवर आम्हाला कारवाई करावी लागेल, असा थेट इशारा आयोगाने (Election Commission) खर्गेंना दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मतदानाच्या आकेडवारीमध्ये कोणतीही चूक नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. मतदानाचा अद्ययावत आकडा त्यादिवसापेक्षा नेहमीच अधिकचा राहिला आहे. काँग्रेसच्या या आधीच्या बेजबाबदार विधानांमध्ये एक पॅटर्न राहिला असून तो चिंताजनक असल्याचे आयोगाने म्हटले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष एक पक्षपाती गोष्ट पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा शब्दांत आयोगाने फटकारले.

Mallikarjun Kharge, Election Commission
Navneet Rana Case : नवनीत राणांना वादग्रस्त वक्तव्य भोवणार; हैदराबादेत गुन्हा दाखल...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com