Prashant Kishor News : महाविकास आघाडीच्या जागा सांगतानाच प्रशांत किशोर यांनी भाजपबाबत केलं मोठं विधान

Prashant Kishor On Modi 3.0 : प्रशांत किशोर यांनी मोदीचं 3.0 कसं असेल, याबाबत भाष्य केलं आहे.
Prashant Kishor
Prashant Kishorsarkarnama
Published on
Updated on

लोकसभा निवडणुकीचे ( Lok Sabha Election 2024 ) पाच टप्पे पार पडले असून अजून दोन टप्प्यातील मतदान बाकी आहे. भाजपकडून ( Bjp ) '400 पार'चा नारा दिला आहे. पण, भाजपला 300 च्या आसपास जागा मिळतील, असा दावा राजकीय रणनितीकार आणि जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी केला आहे. त्यासह महाराष्ट्रातील महाविकास आघाडीबाबतही प्रशांत किशोर यांनी भाष्य केलं आहे.

प्रशांत किशोर ( Prashant Kishor ) म्हणाले, "भाजपला स्वबळावर 370 जागा मिळणं अशक्य आहे. पण, त्यांना जवळपास 300 जागा मिळतील. ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपला 370 जागा मिळतील आणि 'एनएडीए' 400 पार जाईल, असा दावा केला होता. तेव्हाच मी म्हटलेलं, हे शक्य नाही. हे फक्त कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी घोषणाबाजी केली आहे. भाजपला 370 चा आकडा गाठणं शक्य नाही. मात्र, ते 270 च्या खाली सुद्धा येणार नाहीत."

"महाराष्ट्रात महाविकास आघाडीला वाटतंय की, ते 20-25 जागा जिंकतील. पण, त्यांनी 25 जागा जिंकल्या, तरी त्यानं भाजपचं नुकसान होणार नाही. सध्या महाराष्ट्रात भाजपकडे 48 पैकी 23 खासदार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं जास्त जागा जिंकल्या तरी, त्यानं भाजपला विशेष नुकसान होणार नाही," असं प्रशांत किशोर यांनी सांगितलं.

"मला वाटतंय की मोदी 3.0 सरकार धमाकेदारपणे सुरू होईल. केंद्रात सत्ता आणि संसाधनं या दोन्हींचं केंद्रीकरण करण्याचा प्रयत्न होईल. राज्यांची आर्थिक स्वायत्तता कमी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कोणताही मोठा राग नाही," असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com