Lok Sabha Election 2024 : बिहारमध्ये ‘इंडिया’वर शिक्कामोर्तब; लालूंचाच दबदबा, कुणाला किती जागा?

India Alliance Seat Sharing : इंडिया आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण आज आघाडीचे जागावाटप जाहीर करून विरोधकांचा हिरमोड झाला आहे.
Mallikarjun Kharge, Lalu Prasad Yadav
Mallikarjun Kharge, Lalu Prasad YadavSarkarnama
Published on
Updated on

Bihar News : इंडिया आघाडीसाठी उत्तर प्रदेशपाठोपाठ महत्त्वाचे राज्य असलेल्या बिहारमध्ये लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे. मागील काही दिवसांपासून जागावाटपावरून राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसमध्ये वाद असल्याने आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे भाजप आणि मित्रपक्षांचेही आघाडीच्या जागावाटपाकडे लक्ष लागले होते. अखेर दोन्ही पक्षांनी यातून तोडगा काढत आज जागावाटप जाहीर केले.

आघाडीमध्ये राजद (RJD) आणि काँग्रेससह डाव्या पक्षांचाही समावेश आहे. आज संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलेल्या जागावाटपानुसार राजदला 40 पैकी 26 जागा मिळाल्या आहेत, तर काँग्रेसच्या (Congress) वाट्याला नऊ आणि डाव्या पक्षांना पाच जागा मिळाल्या असल्याचे जाहीर करण्यात आले.

Mallikarjun Kharge, Lalu Prasad Yadav
Congress News : प्राप्तिकर विभागाची नोटीस काँग्रेसला कंगाल करणार

बिहारमध्ये (Bihar) भाजप, जेडीयू आणि लोक जनशक्ती पार्टीमध्ये (रामविलास) जागावाटप झाले आहे. भाजप 17 जागांवर जर जेडीयू 16 जागांवर निवडणूक लढणार आहे. लोक जनशक्तीला पाच जागा देण्यात आल्या आहेत. दोन जागा इतर मित्रपक्षांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यात सर्वाधिक जागांवर राजदचे उमेदवार असतील, हे स्पष्ट झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागील लोकसभा निवडणुकीत एनडीएला 40 पैकी 39 जागांवर विजय मिळाला होता. केवळ किशनगंज या मतदारसंघात काँग्रेसचा विजय झाला होता. या वेळी मात्र एनडीए विरोधात नाराजी असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आघाडीची साथ सोडून एनडीएमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्याविरोधात जनतेत नाराजी असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या वाट्याला किसनगंजसह कटिहार, भागलपूर, मुझफ्परपूर, समस्तीपूर, पश्चिम चंपारण, सासाराम, महाराजगंज आणि पटना साहिब हे नऊ मतदारसंघ आले आहेत. तर डाव्यांना बेगुसराई, खगरिया, कराकट, नालंदा आणि आरा या जागा मिळाल्या आहेत. उर्वरित 26 जागांवर राजदचे उमेदवार असतील. 

R

Mallikarjun Kharge, Lalu Prasad Yadav
Mukhtar Ansari Dies: माफिया मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com