Lok Sabha Election 2024 : अखिलेश यांच्याकडून काँग्रेसला अल्टिमेटम; ‘ही’ ऑफर ठरणार अखेरची संधी

Akhilesh Yadav News : अखिलेश यादव यांनी काँग्रेससमोर 17 जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यावर शिक्कामोर्तब न झाल्यास इंडिया आघाडीतून अखिलेश बाहेर पडू शकतात.
Rahul Gandhi, Akhilesh Yadav
Rahul Gandhi, Akhilesh YadavSarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसमधील जागावाटपाचा तिढा सुटण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आता काँग्रेसला अल्टिमेटम दिला आहे. जागावाटपावर निर्णय होईपर्यंत सध्या उत्तर प्रदेशात असलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी काँग्रेसला 17 जागांची शेवटची ऑफर दिली आहे. (Lok Sabha Election 2024)

इंडिया आघाडीतील (India Alliance) घटक पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीनेही आता काँग्रेसला (Congress) इशारा दिला आहे. पश्चिम बंगाल, पंजाब, दिल्लीमध्ये आपने एकला चलोची भूमिका घेतली आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशातील इंडिया आघाडीला धक्का बसण्याची चिन्हं आहेत. सपा आणि काँग्रेसमध्ये अजूनही जागावाटपावर बोलणी सुरू आहेत. काही जागांवर काँग्रेस अडून बसल्याने बोलणी पुढे सरकत नसल्याची चर्चा आहे.

Rahul Gandhi, Akhilesh Yadav
Omar Abdullah News : वाह भाई वाह! ओमर अब्दुल्लांनी आझादांवर हल्लाबोल करत सगळंच काढलं...

अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी आता काँग्रेसला 17 जागांची अखेरची ऑफर दिली आहे. त्यावर शिक्कामोर्तब न झाल्यास ते आघाडीतून बाहेर पडू शकतात. मुरादाबाद आणि बलिया या जागा काँग्रेसला हव्या आहेत. बलियातून प्रदेशाध्यक्ष अजय राय इच्छुक आहेत. मात्र, अखिलेश यांनी अल्टिमेटम दिल्याने काँग्रेसला एक पाऊल मागे घ्यावे लागणार असल्याचे दिसते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

27 उमेदवारांची नावे जाहीर

अखिलेश यांनी आतापर्यंत उत्तर प्रदेशातील 27 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पक्षाकडून वीस दिवसांपूर्वीच सोळा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. आज आणखी अकरा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. अकरा उमेदवारांमध्ये सध्या तुरुंगात असलेला गँगस्टर मुख्तार अन्सारी याच्या भावाचाही समावेश आहे. अफजाल अन्सारी यांना गाजीपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे शाजहानपूरमध्ये राजेश कश्यप, हरदोईमध्ये उषा वर्मा, मिश्रिखमध्ये रामपाल राजवंशी, मोहनलालगंजमध्ये आर. के. चौधरी, प्रतापगडमध्ये एस. पी. सिंह बघेल, बहराईचमध्ये रमेश गौतम, गोंडामध्ये श्रेया वर्मा, चंदौलीमध्ये वीरेंद्र सिंह आणि आंवला मतदारसंघातून नीरज मौर्य यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

R

Rahul Gandhi, Akhilesh Yadav
Lok Sabha Election 2024 : आधी अमेठी आता रायबरेलीतही..! स्मृती इराणींनी वाढवलं काँग्रेसचं टेन्शन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com