Lok Sabha Election 2024 : निवडणूक आयोगाकडून बंगालसह गुजरात, यूपी, बिहारला दणका

Election Commission News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून विविध राज्यांमधील IAS, IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
Election Commission
Election Commission Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभेच्या निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तारखा जाहीर केल्यानंतर आज विविध राज्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दणका दिला आहे. सहा राज्यांतील गृह सचिवांना हटवण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. तसेच पश्चिम बंगालच्या पोलिस महासंचालकांसह, गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह इतर काही राज्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.

निवडणूक आयोगाने (Election Commission) मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याही बदलीचे आदेश काढले आहेत. ठाकरे सरकारच्या काळात चहल मुंबई महापालिकेत आले होते. ते तीन वर्षांहून अधिक काळ या पदावर होते. त्यामुळे त्यांच्या बदलीची मागणी सुरूच होती. अखेर आयोगाकडूनच आज सरकारला दणका देण्यात आला. चहल यांच्यासह महाराष्ट्रातील (Maharashtra) काही अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्याचे आदेश आयोगाने दिले होते.

Election Commission
Electoral Bond News : अजब बाँडची गजब कहाणी! निनावी लिफाफ्यातून थेट पक्ष कार्यालयात दहा-दहा कोटींची देणगी

त्याचप्रमाणे मागील काही दिवसांपासून बंगालमध्ये (West Bengal) संदेशखाली प्रकरणावरून सुरू असलेला वाद, विधानसभा निवडणुकीनंतर झालेली हिंसा, यापार्श्वभूमीवर पोलिस महासंचालक राजीव मलिक यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे गुजरात, बिहार आणि उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश आयोगाने काढले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या गृह सचिवांच्या बदल्या करण्याचे आदेशही निवडणूक आयोगाने दिले आहेत. मिझोरम आणि हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंधित काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना हटवण्यात आले आहे. आयोगाने शनिवारीच निवडणूक कार्यक्रम (Lok Sabha Election Dates) जाहीर केला आहे. त्यानंतर लगेचच बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत.

आयोगाने हटवलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे एकापेक्षा अधिक पदांचाही पदभार होता, अशीही चर्चा आहे. त्यामुळे निवडणुकीत पारदर्शकता असावी, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी आयोगाकडून ही पावले टाकली जात असल्याचे समजते. दरम्यान, आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार देशात पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी आहे. देशात सात टप्प्यांत मतदान होणार आहे. तर चार जून रोजी मतमोजणी होणार आहे.

Election Commission
Congress News : दहा वर्षांत डझनभर माजी मुख्यमंत्री, 50 बड्या नेत्यांचा काँग्रेसला राम राम

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com