New Delhi News : केंद्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये सत्ता गाजवलेल्या काँग्रेसवर (Congress News) मागील दहा वर्षांत मोठे संकट ओढावले आहे. अनेक बड्या नेत्यांनी साथ सोडल्याने पक्षाला मोठा फटका बसला आहे. परिणामी, लोकसभेसह अनेक राज्यांमध्ये विजयासाठी झगडावे लागत आहे. देशात भाजपची सत्ता आल्यापासून काँग्रेसमधील डझनभर माजी मुख्यमंत्री आणि जवळपास ५० बड्या नेत्यांनी काँग्रेसला राम राम ठोकला आहे. त्यातील बहुतेकजण सध्या भाजपमध्ये आहेत.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी भोपाळमध्ये मीडियाशी बोलताना काँग्रेस सोडलेल्या नेत्यांची यादीच जाहीर केली. या वेळी त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावरही टीका केली. भाजपकडून (BJP) शिवराज यांना विदिशा मतदारसंघातून लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) रिंगणात उतरवण्यात आले आहे.
अशोक चव्हाणांसह हे आहेत माजी मुख्यमंत्री
काँग्रेस सोडणाऱ्या माजी मुख्यमंत्र्यांमध्ये अशोक चव्हाणांसह (Ashok Chavan) बारा जणांचा समावेश आहे. किरण कुमार रेड्डी, कॅप्टन अमरिंदर सिंग, एस. एम. कृष्णा, दिगंबर कामत, विजय बहुगुणा, पेमा खांडू, एन. डी. तिवारी, रवी नाईक, गुलाम नबी आझाद, अजित जोगी, लुईजिन्हो फलेरियो यांचा या यादीत समावेश आहे. यापैकी आझाद आणि जोगी वगळता इतरांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ही नावे 2013 पासूनची आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
50 नेत्यांनी सोडली काँग्रेस
माजी मुख्यमंत्र्यांसह अनेक माजी केंद्रीय मंत्री, राज्यांमधील माजी मंत्री, आमदार, खासदार, माजी पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामध्ये ज्योतिरादित्य सिंधिया, मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी, अमरीश डेर, प्रियांका चतुर्वेदी, पी. सी. चाको, जितिन प्रसाद, सुष्मिता देव, हिमंत बिस्वा सरमा, जयंती नटराजन, शंकरसिंह वाघेला, एन. बीरेन सिंह, रीटा बहुगुणा जोशी, हार्दिक पटेल, सुनील जाखड, कपिल सिब्बल, कुलदीप बिश्नोई यांसह जवळपास 50 हून अधिक बड्या नेत्यांचा शिवराज यांनी प्रसिद्ध केलेल्या यादीत समावेश आहे.
निवडणुकीच्या तोंडावर बसू शकतात धक्के
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला महाराष्ट्रासह (Maharashtra) आणखी राज्यांमध्ये धक्का बसू शकतो. मागील काही दिवसांत विविध राज्यांमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. पुढील काही दिवसांत आणखी काही नेते भाजप किंवा अन्य पक्षात दाखल होऊ शकतात. महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांकडूनही तसा दावा केला जात आहे. आसामसह गुजरात, राजस्थान या राज्यांमध्ये मागील काही दिवसांत अनेक स्थानिक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.