Yogi Adityanath News : योगींनी ‘यमराज’लाही आणलं निवडणुकीच्या प्रचारात

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश पिंजून काढला आहे.
Yogi Adityanath
Yogi AdityanathSarkarnama

Uttar Pradesh Political News : सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपला लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात अधिकाधिक जागा जिंकणे आवश्यक आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath News) यांच्याकडून राज्यात जोरदार प्रचार करण्यात आला. आता अखेरच्या टप्प्यातही प्रचार शिगेला पोहचला आहे. यादरम्यान योगींकडून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीवर सातत्याने भाष्य केले जात आहे. (Lok Sabha Election 2024)

गाझीपूर येथे रविवारी झालेल्या एका प्रचारसभेत महिला आणि उद्योजकांच्या सुरक्षेविषयी बोलताना मुख्यमंत्री योगींनी थेट ‘यमराज’ला प्रचारात आणले. महिला आणि उद्योजकांना त्रास देण्याची हिंमत जे करतील, त्यांची पुढच्या चौकात यमराज वाट पाहत असेल, असे विधान योगींनी केले आहे. (Latest Marathi News)

Yogi Adityanath
Bihar Politics:'खाकी'ला 'खादी'चा मोह; माजी पोलिस अधिकारी निवडणुकीच्या आखाड्यात

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh News) कायदा-सुव्यवस्थेचा फज्जा उडवणाऱ्या गँगस्टरवर आता बुलडोझर चालवला जात आहे. सुरक्षा आणि कायद्याचे राज्य ही सुशासनाची पहिली अट असल्याचे योगींनी स्पष्टपणे सांगितले. योगी आदित्यनाथ मुखमंत्री झाल्यानंतर राज्यात गुन्हेगारांच्या घरांवर बुलडोझर चालवला जात आहे. त्यावरून विरोधकांनी सरकारवर केवळ मुस्लिमांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप केला होता. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आम्ही श्रीरामाचे भक्त आहोत. जोपर्यंत पाप करणाऱ्यांना संपवणार नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, असा थेट इशाराही योगींनी दिला. तुमच्या मतांनी अयोध्येत श्रीरामाचे मंदिर बनवलं. जगात देशाचा सन्मान वाढला. देशाच्या सीमेवर सुरक्षा वाढली. विकासकामे झाली. राजमार्ग, विमानतळ, रेल्वे, जलमार्ग या रुपाने सर्वत्र विकास दिसत असल्याचे योगी म्हणाले.

तीच मतं काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला गेल्यानंतर त्यांनी देशाची अब्रु विकली. दहशतवादाला खतपाणी घातले. मुली, उद्योजकांची सुरक्षा धोक्यात घातली. माफियांनी हिंदूंना दहशतीखाली ठेवले, अशी टीकाही योगींनी विरोधकांवर केली.

Yogi Adityanath
Amit Shah News : समान नागरी कायद्याबाबत अमित शाहांनी केलं मोठं विधान; म्हणाले, पुढील पाच वर्षांत...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com