PM Modi : मोदींचा दावा...''काँग्रेसची लुट जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी....''

Rahul Gandhi : काँग्रेस युवराज राजा महाराज यांना शिव्या देत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांचे कार्य काँग्रेस विसरले. काँग्रेस नेते कधी नवाब, सुलतान, बादशाह यांना शिव्या देत नाही, आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
PM Modi, Rahul Gandhi
PM Modi, Rahul Gandhi Sarkarnama

Lok Sabha Election 2024 : काँग्रेस वारसा कर आणु पाहत असुन ते तुमच्या जिवंतपणी तर तुम्हाला लुटणार आहे. मेल्यानंतर देखील लुटणार असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ते उत्तर कनाडा लोकसभा मतदार संघातील प्रचार सभेत बोलत होते. काँग्रेसने अमेरिकेतुन हा नवा प्लॅन आणल्याचे मोदी म्हणाले. त्यांनी काँग्रेसची लुट जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी असे म्हणत काँग्रेसवर जोरदार हल्ला केला आहे.

ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोडा यांनी या विषयी एका टिव्ही शो मध्ये वारसा कराच्या संदर्भात भाष्य केले होते. त्यांच्या या वाक्यावर काँग्रेसने खुलासा केला होता काँग्रेस अशा प्रकारचा कुठलाही कर लादणार नाही. तरी देखील उत्तर कनाडा मध्ये पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसच्या वारसा कराचा मुद्दा प्रचार सभेत वापर करत काँग्रेसवर जोरदार हल्ला करत मोदी म्हणाले की,''काँग्रेसची लुट जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी....'' असेल. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

PM Modi, Rahul Gandhi
Lok Sabha Election 2024 : देवेगौडांचा खासदार नातू देश सोडून पळाला; व्हायरल अश्लील व्हिडीओ प्रकरण भोवणार...

कर्नाटक मध्ये काँग्रेस सरकार मुलींची सुरक्षा करण्यात अपयशी ठरल्याचे मोदी म्हणाले. त्यांनी हुबळी येथे झालेल्या एका मुलीच्या अत्याचाराबद्दल प्रश्न उपस्थित केला. काँग्रेस तुमच्या मुलींची सुरक्षा करु शकते काय अशी विचारणा मोदींनी केली. मोदी सरकार येण्यापुर्वी देशात विविध राज्यात नेहमी बाॅम्बस्फोट होत होते. आता देश सुरक्षित हातात आहे. देशातील प्रत्येक राज्यातील बाॅम्बस्फोट थांबविण्यात केंद्रातील भाजप सरकारला यश आले आहे.

बंगळुरू बाॅम्बस्फोट प्रकरणात कर्नाटक सरकारची बोटचेपी भूमिका होती. त्यांनी हा सिलेंडर स्फोट असल्याचे सांगितले. पण, एनआयए ने या स्फोटाचे खरे कारण समोर आणले आहे. देशातील अत्यंत महत्वाचे बंगळुरू येथे बाॅम्बस्फोट करणारी संघटना वायनाड येथे काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचा आरोप मोदींनी केला. वायनाड मध्ये पीएफआय संघटनेचे मदत घेतली जाते. काँग्रेस निवडणुकीत पीएफआय ची मदत घेत असल्याचा दावा मोदींनी केला आहे. हा नवीन हिंदूस्थान आहे, पाकिस्तानात आत जात आम्ही दहशतवादी ठार मारल्याचा दावा मोदींनी केला.

राहुल गांधी यांनी राजा महाराज अत्याचारी होते. असा आरोप करणारे योग्य नाही, काँग्रेसचा एकुण ट्रक रेकाॅर्ड हा इतिहास नष्ट करणारा आहे. काँग्रेस छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांना कमी लेखत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेले जलव्यवस्थापन हे आज ही महत्वाचे असेच आहे. त्या राजा महाराजांना काँग्रेस राजपुत्र शिव्या देत असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

कदंब राजवंश कनाडी विसरु शकतो. म्हैसुर राज घरणे, गुजरात बडोदा येथे महाराज गायकवाड यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणाची जबाबदारी घेतली त्यांना उच्च शिक्षणासाठी विदेशात पाठविले. काँग्रेस नेते कुण्या सुलतान, बादशाह यांना कधी शिव्या देत नाही. ज्या नवाब, सुलतान, बादशाह यांनी अत्याचार केले. सुलतान यांनी मंदिर लुटले, त्यांना काँग्रेस नेते क्लिनचीट देत फिरत असल्याचा आरोप मोदींनी केला. काँग्रेसचे हे प्रयत्न देशाला विभाजीत करणारे आहे.

काँग्रेस चार रुमच्या घरातील दोन रुम घेणार....

काँग्रेस देशाचा एक्स रे करणार आहे. नागरिकांचा, लाॅकर, घरचा, एक्स रे होणार आहे. तुमच्या कडे जास्त संपत्ती असेल तर काँग्रेस त्यांच्या व्होटबँकेला तो पैसा वाटुन देणार आहे. स्त्री धन, माता भगिनींचे मंगळसुत्रावर काँग्रेसची नजर आहे. तुम्ही जी संपत्ती, पुंजी तुमच्या पिढीसाठी बचत करता. तुम्ही मेल्यानंतर तुमची बचत मुलांसाठी ठेवतात. पण, काँग्रेस नेत्यांनी अमेरिकेतुन घोषणा केली. वारसा हक्क टॅक्स घोषित केला. तुमच्या संपत्ती मधील 55 टक्के काँग्रेसची जमात सरकार जप्त करणार असुन ती तुमच्या मुलाबाळांना मिळणार नाही. असा दावा मोदींनी केला आहे. तुमचे चार रुमचे घर असेल तर दोन रुम काँग्रेस घेईल, दहा एक्कर जागा असेल दर पाच एक्कर काँग्रेस घेईल असा दावा मोदींनी केला.

PM Modi, Rahul Gandhi
KonkanPolitics: राऊतांनी आपलं डिपॉझिट वाचवावं, राणेंच्या सभेपूर्वी मनसे नेत्याचा इशारा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com