Lok Sabha Election Result : मोदींचे टायमिंग चुकले, सेलिब्रेशनआधीच चिंतनाची वेळ

PM Narendra Modi Lok Sabha Election 2024 BJP Vs Congress NDA Vs India Alliance : मागील दोन निवडणुकांच्या निकालानंतर भाजपने केलेला जल्लोष यावेळी दिसत नाही. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
Narendra Modi, JP Nadda
Narendra Modi, JP NaddaSarkarnama

NDA Vs India Alliance : लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांनंतर दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात जल्लोषाची तयारी सुरू होत होती. नरेंद्र मोदींचे ते भारावलेले भाषण ऐकून कार्यकर्त्यांच्या अंगात उत्साह संचारायचा. मागील दोन निवडणुकीच्या निकालानंतर हे दृश्य असायचे. पण यावेळी मोदींचे टायमिंग चुकले असून सेलिब्रेशनवेळीच चिंतन करण्याची वेळ आली आहे.

2014 पर्यंत भाजपच्या चिंतन बैठका सुरू होत्या. पण मोदी लाटेत बैठका थांबल्या. बरोबर दहा वर्षांनी पुन्हा चिंतन करण्याची वेळ भाजपवर आली आहे. सध्याच्या निवडणूक निकालाच्या कलांमध्ये एनडीएचा आकडा जेमतेम 290 पर्यंत पोहचताना दिसत आहे. तर इंडिया आघाडी 230 ते 240 च्या दरम्यान आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने सरकार स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. आघाडीने एनडीएमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

मागील दोन्ही निवडणुकीत एनडीएने 300 पारचा आकडा पार केला होता. त्यामुळे 400 पारचा नारा दिला. पण भाजपची सारीच गणितं यावेळी चुकल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच आता भाजप नेत्यांकडून मित्रपक्षांना फोनाफोनी सुरू करण्यात आली आहे.

इंडिया आघाडीनेही डाव टाकले आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी भाजपचे मित्र नितीश कुमार आण चंद्राबाबू नायडू यांना फोन केल्याची चर्चा आहे. त्यांना आघाडीत घेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपचे नेते हादरले असल्याची जोरदार चर्चा आहे.

Narendra Modi, JP Nadda
Lok Sabha Election Result Live : 'एनडीए'ची पीछेहाट ; इंडिया आघाडीकडून मोठा दणका

एनडीएसह इंडिया आघाडीची बुधवारी दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकांमध्ये कोणते मित्रपक्ष उपस्थित राहणार, कोण गैरहजर राहणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सायंकाळी दिल्लीतील भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com