Lok Sabha Election : अनोखा रेकॉर्ड! एकाच कुटुंबात पाच खासदार अन् जिल्ह्यातील नऊ; जोडपंही दिसणार लोकसभेत

Akhilesh Yadv Family Etawa District Lok Sabha Rajya Sabha : उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्यासह त्यांच्या पत्नी डिम्पल यादव विजयी झाल्या आहेत. त्यामुळे लोकसभेत पती-पत्नी पाहायला मिळणार आहेत.
Lok Sabha
Lok SabhaSarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh : देशात सर्वाधिक लोकसभेच्या जागा असलेले राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. या एका राज्यातून लोकसभेत तब्बल 80 खासदार जातात. यूपीत नेहमीच यादवांचा दबदबा राहिला आहे. त्याला 2024 ची लोकसभा निवडणूकही अपवाद ठरलेली नाही.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह कुटुंबातील पाच सदस्यांना मतदारांनी लोकसभेत पाठवले आहे. त्यामध्ये अखिलेश यांच्या पत्नी डिम्पल यादव यांचाही समावेश आहे. त्यामुळे यावेळी पती-पत्नीची जोडी लोकसभेत आवाज उठवताना दिसणार आहेत. यापूर्वी उत्तर प्रदेशातूनच पप्पू यादव आणि त्यांच्या पत्नी एकाचवेळी लोकसभेत गेले होते.  

अखिलेश हे कनौज तर डिम्पल या मैनपुरी मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. अखिलेश यांचे चुलत बंधू धर्मेंद्र यादव यांनी आझमगड मतदारसंघातून विजय़ मिळवला आहे. दुसरे दोन चुलत बंधू अक्षय यादव आणि आदित्य यादव यांनीही अनुक्रमे फिरोजाबाद आणि बदायूं मतदारसंघात आपले यादव कुटुंबाचे वर्चस्व सिध्द केले आहे.

Lok Sabha
Rajya Sabha Election : काँग्रेसनं घेतली 'रिस्क'; लोकसभा जिंकली, पण राज्यसभेची ‘ती’ जागा जाणार?

अखिलेश यांच्या समाजवादी पक्षाने निवडणुकीत 37 जागा जिंकत भाजपला धूळ चारली आहे. त्यापैकी पाच जागांवर त्यांच्या कुटुंबातील सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत यादव कुटुंबानेच दोन अनोखे रेकॉर्ड केले आहेत.

इटावा जिल्ह्यानेही घडवला इतिहास

लोकसभा निवडणुकीत इटावा जिल्ह्याने इतिहास घडवला आहे. या जिल्ह्यातील मुळ असलेले नऊ जणांना लोकसभेची खासदारकी मिळाली आहे. त्यामध्ये पाच जण यादव कुटुंबातील आहे. हे कुटुंब मुळचे इटावा जिल्ह्यातील आहे. 2015-16 मध्ये या कुटुंबातील तब्बल 20 सदस्य सक्रीय राजकारणात होते. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषदेत कुटुंबातील सदस्य होते.

Lok Sabha
BS Yediyurappa : भाजपला मोठा धक्का, येडियुरप्पांना अटक होणार; गृहमंत्र्यांनीच दिले संकेत...

इटावाचे विद्यमान खासदार जितेंद्र डोहरे हे समाजवादी पक्षाचे आहेत. त्यांनी 58 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. एटा लोकसभा मतदारसंघाचे खासदार देवेश शाक्य हेही मुळचे इटावा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील दोन नेते राज्यसभेचे खासदार आहेत.

समाजवादी पक्षाचे महासचिव रामगोपाल यादव आणि भाजपच्या खासदार गीता शाक्य हे दोघे मुळे इटावा जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे मुळेच इटावाचे असलेले नऊ नेते संसदेत आहेत. हा एक अनोखा विक्रम म्हणावा लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com