Parliament Winter Session : लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या दोन तरुणांची तपास यंत्रणांकडून दिल्लीत कसून चौकशी सुरू आहे. दोन्ही तरूण म्हैसूरु येथील असून तपास यंत्रणांची टीम त्यांच्या घराही पोहचली आहे. सागर शर्मा आणि मनोरंजन अशी दोघांची नावे असून मनोरंजनच्या वडिलांनी मुलाच्या या कृत्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
मनोरंजन याचे वडील देवराज यांनी मुलाच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त केली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, हे अत्यंत चूकीचे आहे. अशाप्रकारचे कृत्य कुणीही करू नये. माझा मुलगा चुकीचा असेल तर मी त्याचा तीव्र निषेध करतो. त्याने समाजासाठी काही चुकीची गोष्ट केली असेल तर त्याला फासावर लटकवा. (Let him be hanged if he has done something wrong for the society said Devraj, father of Manoranjan)
उच्चशिक्षित असूनही नीलम बेरोजगार
संसदेबाहेरही एका महिलेसह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अमोल शिंदे (Amol Shinde) हा लातूरमधील असून महिला हरयाणातील आहे. नीलम असे तिचे नाव आहे. दोघांच्याही घराची झडती घेण्यात आली आहे. नीलमच्या आईने माध्यमांशी बोलताना सांगितले की, बेरोजगारीमुळे ती काळजीत होती. मी तिच्या याबाबत बोलत होते, पण तिने दिल्लीबाबत काहीच सांगितले नव्हते. ती उच्चशिक्षित असूनही नोकरी नसल्याने मरणेच पसंत करेन, असे ती नेहमी सांगायची.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नीलमकडे बीए, एमए, बी.एड., एम.एड., सीटीईटी, एम.फिल. या पदव्या नेट पात्रकाधारक आहे. तिने अनेकदा विविध माध्यमांतून बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच शेतकरी आंदोलनातही तिचा सहभाग होता, अशी माहिती समोर आली आहे.
संसदेत दोघांनी घुसखोरी केल्यानंतर अमोल आणि नीलम यांच्याकडून संसदेबाहेर घोषणाबाजी करण्यात आली होती. अमोलने स्मोक कॅंटलचा वापर केला. लोकसभा आणि संसदेबाहेरील स्मोक कँडल सारखीच होती. त्यामुळे चौघांनी मिळून हा प्लॅन केल्याचा संशय तपास यंत्रणाना आहे. त्यानुसार त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर कसून तपास केला जात आहे.
लोकसभेत दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सागर आणि मनोरंजन यांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारल्या. त्यानंतर एकच खळबळ उडाली. दोघांनीही स्मोक कॅँडल फोडले. त्यामुळे सभागृहात पिवळ्या रंगाचा धूर पसरला होता. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे खासदारीही काही काळ घाबरले होते. पण त्यातीलच काही खासदारांनी दोघांनाही पकडून सुरक्षारक्षकांच्या ताब्यात दिले.
(Edited By - Rajanand More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.