Lok Sabha Security Breach : माझा भाऊ देशभक्त, त्याला कटात अडकवलं! आरोपीच्या बहिणीची मोदींकडे मोठी मागणी

Sagar Sharma : आई राणी शर्मा आणि माही यांनी सागर हा देशभक्त असल्याचे म्हटले आहे.
Sagar Sharma, Rani Sharma
Sagar Sharma, Rani SharmaSarkarnama
Published on
Updated on

PM Narendra Modi : संसदेची चोख सुरक्षाव्यवस्था भेदून लोकसभेत घुसखोरी केलेल्या सागर शर्मा याची आई आणि बहिणीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. सागर हा निर्दोष असून तो देशभक्त आहे. त्याला या कटात अडकविण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करावी, अशी त्यांची मागणी आहे.

सागर हा मूळचा लखनऊचा आहे. त्याची आई राणी शर्मा आणि बहीण माही यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना सागर हा देशभक्त असल्याचे म्हटले आहे. बुधवारी घडलेल्या घटनेमध्ये सागरला गोवण्यात आले आहे. माझा मुलगा असे करू शकत नाही. तो रिक्षा चालवून पैसे कमवत होता. तो एकुलता एक मुलगा असून आमचा आधार आहे. तो निर्दोष असून त्याला अडकवण्यात आले आहे, असे राणी शर्मा म्हणाल्या. (Sagar Sharma is innocent says his Mother and Sister)

Sagar Sharma, Rani Sharma
Lok Sabha Security Breach : लोकसभेत घुसखोरीचा असा झाला प्लॅन! दीड वर्षांपूर्वी सहा जण भेटले अन्...

सागरच्या मित्रांबाबत काहीही माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले. सागरच्या मनामध्ये कुणीतही या गोष्टी भरवल्या आहेत. तो असे करू शकत नाही. तो खूप चांगला मुलगा आहे. मित्रांना भेटण्यासाठी दिल्लीला जात असल्याचे त्याने सांगितले होते. घरी परत येऊन पुन्हा रिक्षा चालवेन, असे म्हणाला होता. रिक्षा चालवून त्याला दररोज ५०० रुपये मिळत होते, असेही राणी शर्मा यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माही शर्मा म्हणाल्या, या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी व्हायला हवी. हे कृत्य करण्यासाठी त्याला ज्यांनी भडकवले त्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी त्यांनी पंतप्रधान मोदींकडे (PM Narendra Modi) केली. माझा भाऊ देशभक्त आहे. तो नेहमीच देशाच्या प्रगतीविषयी बोलतो. प्रत्येक स्वातंत्र्यदिनी तो रिक्षावर तिरंगा लावून बाहेर पडत असे, असेही माही यांनी सांगितले.

Sagar Sharma, Rani Sharma
Lok Sabha Security Breach : संसदेत दुसऱ्या दिवशीही धमाका ; 15 खासदारांचे निलंबन

दरम्यान, तपास यंत्रणांच्या चौकशीमध्ये सर्व आरोपी सोशल मीडियावरील भगत सिंग फॅन क्लबशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. दीड वर्षांपूर्वी ते सर्वजण म्हैसूरू येथे भेटले होते. सागर जुलै महिन्यात लखनऊवरून दिल्लीत आला होता. त्याने संसदेत प्रवेश करण्याचा प्रयत्नही केले होता. पण त्याला जाता आले नव्हते. पण बुधवारी तो आणि मनोरंजन या दोघांनी लोकसभेत प्रवेश करत स्मोक स्कॅंडल जाळत खळबळ उडवून दिली.

(Edited By - Rajanand More)

Sagar Sharma, Rani Sharma
Parliament Security Breach: संसदेत घुसखोरी करणाऱ्या तरुणांना पास का दिले, खासदार सिम्हा यांचे स्पष्टीकरण, म्हणाले..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com