Lok Sabha Security Breach : संसदेत दुसऱ्या दिवशीही धमाका ; 15 खासदारांचे निलंबन

Winter Session : दोन तरुणांनी घुसखोरी केल्याच्या या घटनेचे पडसाद गुरुवारी लोकसभेत उमटले.
lok sabha
lok sabha Sarkarnama
Published on
Updated on

Winter Session : नवीन संसद भवनामध्ये (Parliament House) बुधवारी दोन तरुणांनी घुसखोरी केल्याच्या घटनेनंतर गुरुवारी पुन्हा संसदेच्या दोन्ही सभागृहात हिवाळी अधिवेशनाचे (Winter Session) कामकाज सुरू झाले. या घटनेचे पडसाद गुरुवारी लोकसभेत उमटले. यावेळी विरोधी पक्षांचे सदस्य आक्रमक झाले व त्यांनी या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी केली. या वरून विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेतून 9 काँग्रेस, 2 सीपीएम, 1 सीपीआय, 1 डीएमके असे एकूण 13 खासदारांचे निलंबन केले. राज्यसभेतील तृणमल काँग्रेसच्या एक असे एकूण 14 खासदारांचे निलंबन करण्यात आले. दरम्यान लोकसभेचे कामकाज शुक्रवारी सकाळी 11 पर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

लोकसभेतील टीएन प्रतापन, हिबी इडन, एस. जोथिमनी, रम्या हरिदास आणि डीन कुरियाकोसे या काँग्रेसच्या खासदारांचे निलंबन करण्यात आले. यावेळी या 13 जणांनी सभागृहात चुकीची वर्तणूक केल्याबद्दल हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी लोकसभेतून निलंबन करण्यात आले.

दरम्यान, सुरुवातीला 14 खासदारांना लोकसभेतून निलंबित केले होते. पण एक खासदार तिथं नव्हते तरी त्यांचं निलंबन झाले होते. पण अध्यक्षांना सांगून त्यांचं निलंबन मागे घेतले असल्याची माहिती संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. म्हणजे आता लोकसभेतून एकूण 13 खासदारांच निलंबन, तर राज्यसभेतून 1 खासदाराच असे एकूण 14 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे.

lok sabha
Parliament Winter Session : तृणमूल काँग्रेसला झटका; डेरेक ओब्रायन यांच्यावर निलंबनाची कारवाई

गुरुवारी सभागृह सुरू झाल्यानंतर दरम्यान लोकसभेत विरोधी पक्षांचे सदस्य आक्रमक झाले व त्यांनी या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी केली. या वरून विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. घुसखोरीच्या प्रकरणात झालेल्या सुरक्षेच्या त्रुटीवरून लोकसभेत चर्चा करण्याची मागणी केली. या घटनेवरून सभागृहात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेतून 9 काँग्रेस, 2 सीपीएम, 1 सीपीआय, 1 डीएमके असे एकूण 13 खासदारांचे निलंबन केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, या घटनेचे पडसाद गुरुवारी राज्यसभेत उमटले. राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

(Edited by Sachin Waghmare)

lok sabha
Lok Sabha Security Breach: संसदेतील घुसखोरीप्रकरणी लोकसभा सचिवालयाची मोठी कारवाई; आठ कर्मचारी निलंबित

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com