Lok Sabha Session Update : लोकसभेत दोन खासदारांची शपथ वादात; जय हिंदूराष्ट्र, जय पॅलेस्टाईनचा नारा…

AIMIM Chief Asaduddin Owaisi BJP MP Chhatrapal Singh Gangwar Oath taking : 18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात सोमवार आणि मंगळवारी खासदारांना सदस्यत्वाची शपथ देण्यात आली.
Chhatrapal Singh Gangwar, Asaduddin Owaisi
Chhatrapal Singh Gangwar, Asaduddin OwaisiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : लोकसभेत सदस्यत्वाची शपथ घेताना खासदारांनी केलेल्या नारेबाजीवरून वाद निर्माण झाला आहे. शपथ घेतल्यानंतर अनेक खासदारांनी जय शिवराय, जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र, जय संविधान असे विविध नारे दिले. पण दोन खासदारांचा नारा वाद निर्माण करणारा ठरला आहे.

AIMIM चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मंगळवारी शपथ घेतली. यावेळी त्यांनी जय पॅलेस्टाईनचा नारा दिला. शपथ घेतल्यानंतर त्यांनी सर्वात जय भीम म्हटले. त्यानंतर जय मीम, जय तेलंगणा आणि जय पॅलेस्टाईनचा नारा दिला. ओवेसींनी पाचव्यांदा लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी त्यांची शपथ वादात सापडली आहे.

ओवेसी यांनी यांनी नारेबाजीचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, कोण काय म्हणाले, हे सर्व तुमच्यासमोर आले. इतरांनी काय म्हटले तेही ऐका. मी दिलेला नारा संविधानविरोधी कसा आहे. संविधानामध्ये तशी तरतूद आहे का दाखवा, असे ओवेसी म्हणाले. भाजप नेत्यांनी मात्र ओवेसी यांच्या शपथेवर आक्षेप घेतला आहे.

Chhatrapal Singh Gangwar, Asaduddin Owaisi
Lok Sabha Speaker Election : ममतांचा विरोधकांना पुन्हा झटका; लोकसभेत बुधवारी होणार ‘खेला’?

भाजपचे नेते जी. किशन रेड्डी म्हणाले, ओवेसींच्या या नाऱ्याचा आम्ही विरोध करतो. हा नारा रेकॉर्डवरून हटवायला हवा. एकीकडे संविधानाविषयी बोलायचे आणि दुसरीकडे त्याविरोधी नारेवाजी करायची. भारतात राहून फिलिस्तानचे गुणगान करणे चुकीचे आहे. यामुळे त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे.

Chhatrapal Singh Gangwar, Asaduddin Owaisi
Lok Sabha Speaker : विरोधकांची 'ती' अट ठरली लोकसभा अध्यक्षपदाच्या ऐतिहासिक निवडणुकीस कारणीभूत!

हिंदूराष्ट्राचा नारा

भाजपचे उत्तर प्रदेशातील बरेली लोकसभा मतदारसंघाचे खासदार छत्रपाल सिंह गंगवार यांनी शपथ घेतल्यानंतर जय हिंदूराष्ट्र, जय भारत असा नारा दिला. त्यावर लगेच विरोधकांनी लोकसभेतच आक्षेप घेतला. हा जय हिंदूराष्ट्र हा नारा संविधानविरोधी असल्याचा दावा विरोधकांनी केला. काही सदस्यांनी उभे राहून याबाबत हंगामी अध्यक्षांकडे दाद मागितली. त्यानंतर काही वेळाने विरोधक शांत झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com