Lok Sabha Session : पत्नी, भाऊ, काकाला नव्हे तर अखिलेश यांनी लोकसभेत ‘या’ नेत्याला पहिल्या रांगेत बसवलं!

Akhilesh Yadav Parliament Samajwadi Party Awadhesh Prasad : समाजवादी पक्षाचे सर्व खासदार अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली एकत्रितपणे संसदेत दाखल झाले.
Samajwadi Party MPs
Samajwadi Party MPsSarkarnama

New Delhi : 18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी संसदेच्या आवारात अनेक नजारे पाहायला मिळाले. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह नव्याने निवडून आलेले खासदार लोकसभेत शपथ घेत असताना बाहेर विरोधी पक्षातील खासदार हातात संविधानाची प्रत घेऊन आंदोलन करत होते.

समाजवादी पक्षाच्या खासदारांमध्ये मोठा उत्साह होता. उत्तर प्रदेशात पक्षाला तब्बल 37 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव सर्व खासदारांसह अतिशय उत्साहात संसदेत दाखल झाले. पण त्यांनी इतर कोणत्याही खासदारापेक्षा अवधेश प्रसाद यांना अधिक महत्व दिल्याचे पाहायला मिळाले.

Samajwadi Party MPs
JP Nadda : जे. पी. नड्डा यांच्यावर संसदेत मोठी जबाबदारी; पियूष गोयल यांची जागा घेणार

नेमकं काय घडलं?

अवधेश प्रसाद हे फैजाबाद मतदारसंघाचे खासदार आहे. याच मतदारसंघात अयोध्याही आहे. त्यामुळे हा विजय विरोधकांसाठी मोठा ठरला आहे. अखिलेश यांनाही या विजयाचे महत्व चांगलेच माहिती आहे. त्यामुळेच संसदेच्या पायऱ्यांवर आल्यानंतर सर्व खासदारांमध्ये मागे उभे राहिलेल्या अवधेश यांना त्यांनी हाताला धरून पुढे आणले.

अखिलेश यांच्या पत्नी डिंपल यादव, काका राम गोपाल यादव, त्यांचे चुलत भाऊही यावेळी सोबत होते. पण त्यांना मागे सोडत अखिलेश यांनी अवधेश प्रसाद यांना पुढे आणले. हाच नजारा लोकसभेच्या सभागृहातही दिसून आला.

Samajwadi Party MPs
Varsha Gaikwad : प्रवास तोच, वळण नवे..! वर्षा गायकवाड दिल्लीतही आक्रमक

सभागृहातील पहिल्या रांगेत अखिलेश यांनी अवधेश प्रसाद यांना आपल्या सोबत बसविले होते. मागील रांगेत पत्नी डिंपल होत्या. त्यामुळे अखिलेश यांनी सोमवारी अवधेश प्रसाद यांना दिलेल्या महत्वावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

अवधेश प्रसाद हे पासी या दलित समाजातील नेते आहेत. त्यांच्या माध्यमातून बहुजन समाज पक्षाकडील दलित मतांना आपल्याकडे खेचले जाऊ शकते. तसेच ते अयोध्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असल्याने एकप्रकारे सत्ताधारी भाजपलाही सूचक संकेत दिल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com