Akhilesh Yadav : अखिलेश यांनी भाजपच्या जखमेवर मीठ चोळलं; ‘त्या’ व्हिडिओवरून योगींवर सोडला बाण  

Lok Sabha Session Yogi Adityanath Uttar Pradesh Politics : अखिलेश यादव यांनी मंगळवारी लोकसभेत अर्थसंकल्पावर भाषण केले.
Akhilesh Yadav : अखिलेश यांनी भाजपच्या जखमेवर मीठ चोळलं; ‘त्या’ व्हिडिओवरून योगींवर सोडला बाण  
Published on
Updated on

New Delhi : उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा झटका बसला. त्यानंतर नुकतीच दिल्लीत भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची परिषद झाली. यादरम्यानचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यावरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मंगळवारी लोकसभेत भाजपच्या जखमेवर मीठ चोळले.

मुख्यमंत्री परिषदेवेळी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांचे फोटोसेशन झाले. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधानांना नमस्कार केला नाही. तर अमित शाह यांनी योगींकडे दुर्लक्ष केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विरोधी पक्षातील काही नेत्यांनीही हा व्हिडिओ शेअर केला आहे.

Akhilesh Yadav : अखिलेश यांनी भाजपच्या जखमेवर मीठ चोळलं; ‘त्या’ व्हिडिओवरून योगींवर सोडला बाण  
Vidya Chavan Vs Chitra Wagh : विद्या चव्हाणांनी बाहेर काढली चित्रा वाघ यांची ऑडिओ क्लिप

अखिलेश यांनी यावरूनच भाजपसह योगींवरही निशाणा साधला. अर्थसंकल्पावर बोलताना त्यांनी उत्तर प्रदेशला काहीच दिले नाही, असे सांगत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, उत्तर प्रदेशात पराभव झाल्यापासून कुणीच नमस्कार करत नाही. तुम्हाला याचाच जास्त त्रास होत आहे. तो व्हिडिओ आम्ही पाहिला आहे. कुणीच कुणाला नमस्कार करत नाही, कुणी कुणाला पाहत नाही.

जे स्वत:ला खूप ताकदवान समजत होते, ते ज्याने हरवले त्यांना हटवू शकत नाहीत, असा टोला अखिलेश यांनी पंतप्रधान मोदींना लगावला. उत्तर प्रदेशात उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी योगींमुळे राज्यात पराभव झाल्याचे सूचक विधान भाजपच्या बैठकीतच केले होते. त्यावरून राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Akhilesh Yadav : अखिलेश यांनी भाजपच्या जखमेवर मीठ चोळलं; ‘त्या’ व्हिडिओवरून योगींवर सोडला बाण  
Rajya Sabha Session : मर्यादेत राहा! जगदीप धनखड यांचा पारा चढला, खर्गेंना सुनावलं...

मौर्य यांनी सोमवारीही सरकारमुळे निवडणुका जिंकता येत नाहीत, पक्ष आणि कार्यकर्त्यांमुळे विजय होतो, असे विधान करत पुन्हा एकदा योगींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. अखिलेश यादव यांनीही मौर्य यांना थेट ऑफर दिली होती. मंगळवारी त्यांनी लोकसभेतही उत्तर प्रदेशातील भाजपच्या पराभवाचा मुद्दा उपस्थित करून पक्षांतर्गत वादात तेल टाकण्याचे काम केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com