G-20 Narendra Modi
G-20 Narendra Modi Sarkarnama

Narendra Modi: अयोध्येतील राम मंदिराबाबतची 'ती' इच्छा मोदी पूर्ण करणार..?

Ayodhya Ram Mandir : मराठी माणसांच्या घरात घरात पोहचलेले अजरामर अशा गीतरामायणाला...
Published on

सचिन देशपांडे

Pune News : अयोध्येतील राम मंदिरात एक छोटे गीतरामायण मंदिर व्हावे अशी इच्छा ग.दि.माडगूळकर यांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुमित्र माडगूळकर यांची ही इच्छा पूर्ण करणार का याबाबत चर्चा जोर धरू लागली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी पाठपुरावा करणार का अशी विचारणा सुमित्र माडगूळकर यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे केली आहे.

मराठी माणसांच्या घरात घरात पोहचलेले अजरामर अशा गीतरामायणाला अयोध्येतील राम मंदिरात स्थान मिळावे. यासाठी महाकवी ग. दि.माडगूळकर यांचा नातू सुमित्र माडगूळकर यांनी थेट सोशल मिडियावर या विषयीची मागणी करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे.

G-20 Narendra Modi
Sharad Pawar and Ajit Pawar : शरद पवार, अजित पवार लवकरच पुन्हा एका व्यासपीठावर येणार!

गडकरी आणि फडणवीस यांनी मोदींकडे या विषयाचा पाठपुरावा केल्यास अयोध्येतील राम मंदिरात (Ram Mandir) बहुभाषेत गायले गेलेले गीतरामायण व गदिमा तसेच सुधीर फडके यांच्यासाठी एक कोपरा राखीव ठेवावा, अशी मागणीच सुमित्र माडगूळकर यांनी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी राममंदिर उदघाटन सोहळ्यात गीतरामायणाचा समावेश व्हावा अशी विनंती केली आहे.

फेसबुकवर सुमित्र माडगूळकर यांनी "राममंदिर आनंद सोहळ्यात गीतरामायणाचा समावेश व्हावा" अशी मागणी करत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी मनातले गीतरामायणाचे महत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्यापर्यंत पोहोचवायला हवे व अयोध्येतील राम मंदिरात एक कोपरा तरी गीतरामायण व गदिमा - बाबुजी यांच्यासाठी राखीव हवा असे मनापासून वाटते, असे सुमित्र माडगूळकर यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राबाहेरही गीतरामायण पोहोचले पाहिजे व होणाऱ्या आनंद सोहळ्यात त्याचा समावेश झाला तर यासारखा परमोच्च आनंद दुसरा नाही. मुख्यतः राम मंदिरात एक छोटे गीतरामायण मंदिर हवे असे वाटते. गीतरामायणाचे अनेक भाषांत रूपांतर झाले आहे,गीतरामायण आता महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता भारतमय व्हावे अशी मागणी सुमित्र माडगूळकर यांनी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अयोध्येत राम मंदिर उदघाटन सोहळ्यात आमंत्रण आले नाही असे सुमित्र माडगूळकर यांनी सांगितले. पण, आमंत्रणाचा त्यांचा आग्रह नव्हता तर गीतरामायण अयोध्येत असावे, गदिमा, बाबुजी (सुधीर फडके) यांना कोपरा मिळावा यासाठी त्यांनी आग्रह कायम ठेवला. सुवर्ण महोत्सवानिमित्त शरद पवार (Sharad Pawar) यांनी विशेष विमानाने अटल बिहारी वाजपेयी यांना आणले होते. राजकीय विरोध बाजूला ठेवत गीतरामायण कलाकृतीला सर्वांनी पाठबळ द्यावे ही मागणी सुमित्र माडगूळकर यांनी केली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

G-20 Narendra Modi
Mcoca Act : पुण्याच्या रितेश कुमारांचं `मोक्का`चं शतक तर पिंपरी-चिंचवडच्या विनयकुमार चौबेंचं अर्धशतक, तरीही...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com