Gujrat Politics : सूरतमार्गे काय गेले, गुजरातचे इतके प्रेम की....

Eknath Shinde : मुख्यमंत्री शाळा अभियानात पण सहभाग
Eknath Shinde & Gujrat
Eknath Shinde & GujratSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Leaders : शिवसेनेत बंड करत एकनाथ शिंदे यांनी सूरतमार्गे पुढचा प्रवास केला. त्या प्रवासातून ते मुख्यमंत्री झाले. राज्यात शिवसेना व भाजपा महायुतीचे सरकार आले. मंत्रिमंडळ स्थापन झाले. विविध खाती मंत्र्यांना देण्यात आली. हे देताना अनेक गोष्टी मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्रातून गुजरातला नेल्या गेल्या.

अलीकडच्या काळात मोठे उद्योग असो की एखादा इव्हेंट तो गुजरात गेल्याची ओरड झाली. पण आता राज्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा समृद्ध शाळा’ याअंतर्गत गुजरातवर फोकस करण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. यातून शाळांच्या शिक्षकांना तर गुजरातचा अभ्यास करावा लागत आहेच याशिवाय गुजराती पोशाख, भाषा, रितरिवाज, खाद्यपदार्थ, राजकीय नेते मंडळी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी अभ्यास करून त्याचा पाठ विद्यार्थ्यांना शिकवावा लागत आहे.

Eknath Shinde & Gujrat
Solapur: गैरव्यवहाराचा सेतू..! भ्रष्ट गुजरात इन्फोटेक कंपनीला प्रशासनाचा 'आशीर्वाद'

काही शाळांनी तर या विषयीचे कार्यक्रम घेत ‘मुख्यमंत्री माझी शाळा समृद्ध शाळा’ हा उपक्रम यशस्वी करण्याचा चंगच बांधला आहे. याचे कारण म्हणजे हा उपक्रम पाच गुणांचा आहे. महाराष्ट्रातील मराठी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा इतिहास, देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात मराठी नेत्यांचे योगदान, संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास, मराठी खाद्य संस्कृती, मराठी भाषा, मराठी रितीरिवाज, विविध भागातील मराठी बोली भाषा, महाराष्ट्र स्थापना कशी या विषयाचा समावेश या ‘मुख्यमंत्री माझी शाळा समृद्ध शाळा’ या उपक्रमात गरजेचा होता.

महाराष्ट्राविषयी उपक्रमासाठी शाळांच्या शिक्षकांनी अभ्यास करुन तो मुलांसमोर मांडला असता. पण थेट गुजरात राज्याची माहिती गोळा करावी लागत आहे. ‘मुख्यमंत्री माझी शाळा समृद्ध शाळा’ या अभियानात राज्याच्या शिक्षण विभागाचे गुजरात प्रेम दाखविले. गुजरातच्या राजकीय नेतृत्वावर प्रेम करण्याच्या नादात मराठी शालेय विद्यार्थ्यांना गुजरात विषयी जिव्हाळा निर्माण करण्याचा प्रयत्न यातून होत तर नाही ना? अशी शंका उपस्थित होते. हा राजकीयदृष्ट्या शरण जाण्याचे द्योतक आहे काय असा प्रश्न उपस्थित होतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

‘मुख्यमंत्री माझी शाळा समृद्ध शाळा’ अभियानात उपक्रम राबविताना तंबाखूमुक्त शाळा उपक्रमाला केवळ एक गुण देण्यात आला आहे. विद्यार्थी मंत्रिमंडळ, बालसंसद स्थापन करण्यास दोन गुण, नवभारत साक्षरता अभियानास तीन गुण, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याबाबतच्या उपक्रमास पाच गुण देण्यात आले आहेत. या सर्वाधिक गुण असलेल्या उपक्रमात उदाहरण दिलेले राज्य गुजरात असून शिक्षकांनी गुजरात चा इतका धसका घेतला आहे.

राज्यातील अनेक शाळांमध्ये हा उपक्रम राबविला गेला. शाळेने एक राज्य निवडावे असे शिक्षण विभागाने सांगितले. पण, उदाहरण म्हणून गुजरात समोर केले. त्या राज्याचा सांस्कृतिक वारसा जसे पेहराव, खानपान, सण, उत्सव इत्यादी बाबत तसेच राष्ट्राच्या उभारणीत त्या राज्याचे योगदान याची माहिती दर्शविणारे सादरीकरण शाळांमध्ये सुरू झाले आहे.

Eknath Shinde & Gujrat
Shivsena News : 'मोदी गया तो गुजरात गया' या बाळासाहेबांच्या विधानाची का होते आठवण ?

महाराष्ट्रातील या उपक्रमात शिक्षण विभागाने गुजरात राज्याचे उदाहरण दिल्याने विद्यार्थ्यांनी गुजराती पोशाखामध्ये हे उपक्रम सुरू केले आहेत. गुजराती सण उत्सवांमध्ये पतंग महोत्सव, गरबा, नवरात्री या सारखे सादरीकरण सुरू आहे. त्याच बरोबर ढोकळा आणि इतर गुजराती पदार्थ यांची ओळख करून देण्यात येत आहे. गुजरातमध्ये महात्मा गांधींनी साबरमती आश्रमातून स्वातंत्र्य चळवळीचे केलेले काम, सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान या विषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येत आहे. अशा प्रकारे नियोजन करुन अहवाल शाळेत ठेवावा, असे फर्मान शिक्षण विभागाने काढले आहे.

गुजरातच का? असा प्रश्न अनेक शिक्षकांना पडला असून विभागाच्या आदेशाने त्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यात हा उपक्रम सुरू असून पालकांनादेखील गुजरात विषयीच्या विशेष प्रेमाचे महत्त्व कळले नाही. विद्यार्थ्यांना पहिले संपूर्ण महाराष्ट्राची ओळख व्हावी, यासाठी उपक्रम घेण्याची गरज पालकांनी व्यक्त केली.

Eknath Shinde & Gujrat
Bilkis Bano Case : बिल्किस बानो प्रकरणी गुजरात सरकारला सर्वात मोठा धक्का; दोषींची सुटका रद्द..

बाल वयापासूनच गुजरात विषयी प्रेमाचे धडे विद्यार्थ्यांना ‘मुख्यमंत्री माझी शाळा समृद्ध शाळा’ या उपक्रमातून देण्यात येत आहे. हा बाल मनाला आकार देण्याचा प्रयत्न आहे की, राजकीय नेत्यांचे गुजरात विषयी असलेले अधिक प्रेम यातून उफाळून आल्याचे चित्र आहे, असा प्रश्न पालकांना पडला आहे. सूरतमार्गे एकनाथ शिंदे गेल्यानंतर सरकार काय स्थापन झाले, राज्याच्या शिक्षण विभागानेदेखील गुजरात प्रेमाचे धडे विद्यार्थ्यांना गिरविणे सुरू केले. हे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Eknath Shinde & Gujrat
BJP Politics : गुजरात भाजप नेत्याच्या कन्येचे गिरीश महाजनांना आव्हान ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com