Karnataka Loksabha Election
Karnataka Loksabha Electionsarkarnama

Loksabha Election News : रेवण्णा प्रकरणाची कर्नाटकातील दुसऱ्या टप्प्यावर सावली; भाजपला किंमत चुकवावी लागणार..?

Karnataka Loksabha कर्नाटकात लोकसभेच्या २८ जागा असून गतवेळी त्यापैकी २६ जागा भाजपने जिंकल्या होत्या. इथले मतदान दोन टप्प्यांत होत असून पहिला टप्पा २६ एप्रिलला पार पडला, त्यात दक्षिण कर्नाटकातील १४ जागांवर मतदान झाले.

-विजय चोरमारे

Shimoga News : उत्तरेतील राज्यांप्रमाणेच भारतीय जनता पक्षामागे खंबीरपणे उभे राहणारे राज्य म्हणून आजवरची कर्नाटकाची ओळख आहे.परंतु यावेळच्या निवडणुकीचे चित्र वेगळे असण्याची शक्यता आहे. भाजपला या राज्यात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पहिला टप्पा संपता-संपता प्रज्वल रेवण्णा प्रकरणसमोर आल्यामुळे दुसऱ्या टप्प्यावर त्याच प्रकरणाची सावली असून, त्याची भाजपला मोठी किंमत चुकवावी लागेल,अशी राजकीय वर्तुळातील चर्चा आहे.

कर्नाटकात लोकसभेच्या २८ जागा असून गतवेळी त्यापैकी २६ जागा भाजपने जिंकल्या होत्या. इथले मतदान दोन टप्प्यांत होत असून पहिला टप्पा २६ एप्रिलला पार पडला, त्यात दक्षिण कर्नाटकातील १४ जागांवर मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात सात मे रोजी १४ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.

भाजपने या राज्यात देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाशी (जेडीयू) आघाडी केली असून भाजप २५ आणि जेडीयू तीन जागा लढवत आहे. पैकी ‘जेडीयू’ लढवत असलेल्या तिन्ही जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान पार पडले आहे, ही जेडीयूसाठी जमेची बाजू असली तरी प्रज्वल रेवण्णा प्रकरणापासून भाजपला मात्र सुटका करून घेता येत नसल्याचे चित्र दिसते.

Karnataka Loksabha Election
Karnatak BJP Politics : कर्नाटकात 'ऑपरेशन लोटस' राहिले दूरच,भाजपच्याच मागे लागला भ्रष्टाचाराचा भुंगा!

प्रज्वल रेवण्णा हा माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू. २०१९ मध्ये दोन विरोधी उमेदवार निवडून आले होते, त्यात जेडीयूचे रेवण्णा आणि काँग्रेसचे डी.के. सुरेश यांचा समावेश होता. यावेळी रेवण्णा हसन मतदारसंघातून उभे होते आणि त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सभा घेतली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पहिल्या टप्प्याच्या मतदानाच्या तोंडावर प्रज्वल रेवण्णाशी संबंधित लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ असलेला पेन ड्राईव्ह चर्चेत आला आणि कर्नाटकाची सगळी निवडणूकच त्या मुद्याभोवती फिरू लागली. पंतप्रधान मोदींनी सभा घेतल्यामुळे काँग्रेसकडून थेट मोदींनाच लक्ष्य करण्यात येत आहे. हे प्रकरण रेवण्णा व जेडीयूशी संबंधित असल्याचे सांगून भाजपकडून सारवासारव केली जात होती. परंतु रेवण्णा परदेशात पळून गेल्याने, केंद्राच्या सहकार्याशिवाय हे घडू शकत नसल्याचा आरोप होत आहे.

Edited By : Umesh Bambare

Karnataka Loksabha Election
Karnatak Assembly Election Voting 2023 : उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद,'या' नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com