Sex Scandal News : 3,000 हजार व्हिडिओ अन् ब्लॅकमेलिंग; देवेगौडा नातवाला पक्षातून काढणार?

Prajwal Revanna : महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपात एच. डी. देवेगौडांचे खासदार नातू आमदार मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची कर्नाटक सरकारने एसआयटी चौकशी सुरू केली आहे.
Prajwal Revanna, HD Deve Gowda
Prajwal Revanna, HD Deve GowdaSarkarnama
Published on
Updated on

Karnataka News : एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा धडाडत असताना माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे कुटुंब संकटात सापडले आहे. महिलांचे लैंगिक शोषण (Sex Scandal News) केल्याप्रकरणी त्यांचे खासदार नातू प्रज्वल रेवण्णा आणि आमदार मुलगा एच. डी. रेवण्णा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना भाजपच्याच एका नेत्याने आपल्याकडे प्रज्वल रेवण्णा यांचे तीन हजार व्हिडिओ असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. तर जनता दल (धर्मनिरपेक्ष) आमदारांनीही आता प्रज्वल यांच्याविरोधात मोर्चा उघडत निलंबनाची मागणी केली आहे.

जेडीएसच्या (JDS) कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक मंगळवारी होणार आहे. या बैठकीत प्रज्वल (Prajwal Revanna) यांच्या पक्षातून निलंबनाबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रज्वल हे सध्या जर्मनीत आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर कर्नाटक (Karnataka) सरकारने एसआयटी चौकशी सुरू केली आहे. त्यानंतर ते परदेशात गेले आहेत. (HD Deve Gowda News)

Prajwal Revanna, HD Deve Gowda
Revanth Reddy News : अमित शाहांचा ‘तो’ व्हिडिओ काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना भोवणार; दिल्ली पोलिसांची नोटीस

स्वयंपाकी महिलेकडून तक्रार

कर्नाटकातील पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वीच प्रज्वल यांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले. प्रज्वल हे स्वत: हसन मतदारसंघातील उमेदवार आहेत. त्यामुळे जेडीएससह भाजपच्या (BJP) अडचणीही वाढल्या. त्यानंतर प्रज्वल यांच्याच घरातील स्वयंपाकी महिलेनेही प्रज्वल यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला. त्यानंतर प्रज्वल यांच्यासह वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला.

 (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजप नेत्याचा मोठा दावा

भाजपचे नेते देवराजे गौडा यांचे एक पत्र समोर आले आहे. त्यांनी मागील वर्षी डिसेंबर महिन्यातच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांना हे पत्र लिहिले होते. त्यामध्ये त्यांनी आपल्याकडे महिलांच्या लैंगिक शोषणाचे तीन हजार व्हिडिओ असलेले पेनड्राइव्ह असल्याचा दावा केला आहे. पत्रामध्ये आरोप केले होते की, प्रज्वल यांच्यासह देवेगौडा यांच्या कुटुंबातील अनेक नेत्यांवर गंभीर आरोप आहेत. व्हिडिओमधील काही महिला सरकारी अधिकारी आहेत. या व्हिडिओंचा वापर करून संबंधित महिलांना ब्लॅकमेल केले जात असल्याचा आरोपही करण्यात आला होता.

पक्षातूनच निलंबनाची मागणी

रेवण्णांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बाप-लेकाला पक्षातून निलंबित करण्याची मागणी होत आहे. पक्षाचे आमदार समृद्धी मंजूनाथ यांनी दोघांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी उघडपणे केली आहे. जनतेसमोर पक्षाची मान खाली गेली आहे. एच.डी. देवेगौडा आणि कुमारस्वामी (HD Kumaraswamy) यांना योग्य निर्णय घ्यायचा आहे. पक्षाचे भवितव्य आता तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे, असेही मंजूनाथ यांनी म्हटले आहे. त्यामुळे देवेगौडांवरील दबाव वाढला आहे.

रेवण्णांनी आरोप फेटाळले

एच. डी. रेवण्णा यांनी हे षडयंत्र असल्याचा दावा केला आहे. आम्ही घाबरून पळून जाणारे नाही. व्हायरल व्हिडिओ चार ते पाच वर्षांपूर्वीचे आहेत. हे षडयंत्र असून याविषयी आपल्याला माहिती नाही. मागील चाळीस वर्षांत काँग्रेस सरकारच्या काळात आमची सीआयडी, एसआयटी अशा विविध प्रकारे चौकशी झाली आहे. आता त्यांचे सरकार आहे, चौकशी करूद्या, असे रेवण्णा यांनी म्हटले आहे. मात्र, व्हिडिओ छेडछाड केली असल्याचा दावा त्यांनी एकदाही केलेला नाही.

R

Prajwal Revanna, HD Deve Gowda
Congress News : काँग्रेस उमेदवार 'बम' यांचा धमाका; उमेदवारी अर्ज मागे घेत थेट भाजपमध्ये प्रवेश

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com