

नवी दिल्ली : दिल्लीसह देशात अनेक ठिकाणी एकतर्फी प्रेमप्रकरणांतून अल्पववयीन मुलींवर होणारे प्राणघातक हल्ले वाढले असून गणपती बाप्पाच्या आशीर्वादानेच या ‘लव्ह जिहाद' (Love Jihad)पासून देशाला मुक्ती मिळावी,असे साकडे विश्व हिंदू परिषदेने (Vishwa Hindu Parishad) घातले आहे. (Viashwa Hindu Parishad Latest News)
विहिंपच्या वतीने दिल्ली व परिसरात यंदा मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नेहरू नगर येथील सनातन वेद गुरुकुल येथे यानिमित्त भव्य गणेशमूर्तीसह १०८ लहान मूर्तींचीही प्रतिष्ठापना करण्यात आली होती, यानिमित्त रोज पहाटे मंत्रघोषात पूजा करण्यात आणि सायंकाळी भजन संध्या आयोजित करण्यात आली. यानिमित्त निघालेल्या भव्य शोभायात्रेतही हजारो भाविक सहभागी झाले होते.
झारखंडमध्ये अलीकडंच एका तरूणाने विद्यार्थिनीला पेट्रोल टाकून जाळले. त्यापाठोपाठ दिल्लीतही एका विद्यार्थिनीवर गोळीबार झाला. संगम विहारच्या वीर सिंग की कोठी भागात अली नावाच्या किशोरवयीन मुलाने नयना मिश्रा या ११ वीच्या विद्यार्थिनीवर भरदिवसा गोळीबार केला. ही विद्यार्थिनी सुदैवाने बचावली मात्र तिच्या खांद्यात गोळी रुतून बसली आहे. दिल्ली पोलिसांनी अलीसह तिन्ही आरोपींना पकडले आहे.
विहिंपच्या बैठकीत, हिंदू समाजाने एकजुटीने अशा राक्षसी शक्तींचा नायनाट करण्याची वेळ आल्याचे विहिंपच नेते नंदकिशोर, सुरेंद्र जै, कपील खन्ना आदींनी केले. लव्ह जिहादच्या घटना देशात पुन्हा वाढू लागल्या आहेत. संघटित शक्तीनेच या घटनांचा मुकाबला करण्यात येईल. गणेशाच्या आशीर्वादाने या वृत्तींचा नाश होईल त्यासाठी बाप्पाने हिंदू बांधवांना शक्ती व आशीर्वाद द्यावा असे मागणे विहिंपच्या वतीने गणेशाजवळ करण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.