ओमिक्रॉनचा धोका वाढला; 'या' राज्यांत रात्रीची संचारबंदी

कोरोना (Covid-19) विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या प्रकाराने आता डोके वर काढले आहे.
Night Curfew in Madhya Pradesh

Night Curfew in Madhya Pradesh

Sarkarnama

नवी दिल्ली : कोरोना (Covid-19) विषाणूच्या ओमिक्रॉन या नव्या प्रकाराने आता डोके वर काढलं आहे. देशातील ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत मागील 24 तासांत 18 टक्के वाढ झाली आहे. ओमिक्रॉन रुग्णांची संख्या आता 236 झाली असून, सर्वाधिक 65 रुग्ण महाराष्ट्रात आहेत. यामुळे महाराष्ट्राने पुन्हा एकदा केंद्र सरकारची चिंता वाढवली आहे. आता मध्य प्रदेशने (Madhya Pradesh) रात्रीच्या संचारबंदीची (Night Curfew) घोषणा केली आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्यात रात्रीच्या संचारबंदीची घोषणा केली आहे. राज्यात रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत संचारबंदी असणार आहे. देशभरात ओमिक्रॉन (Omicron) रुग्ण वाढू लागले आहेत. असे असले तरी मध्य प्रदेशात आतापर्यंत एकही ओमिक्रॉनचा रुग्ण आढळलेला नाही. कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी सरकारने खबरदारी म्हणून आतापासूनच निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे.

डेल्टाच्या जागी आता ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे तिसरी लाट (Third Wave) पुढील वर्षाच्या सुरवातीला येईल, असा अंदाज आहे. ओमिक्रॉन हा अतिशय वेगाने संसर्ग होणारा आहे. यामुळे केंद्रासह राज्यांच्या आरोग्य यंत्रणा धास्तावल्या आहेत. केंद्र सरकारही यामुळे खडबडून जागे झाले आहे. अनेक राज्यांनी निर्बंध घालण्यास सुरवात केली आहे. दिल्ली सरकारने नाताळ आणि नववर्षाच्या जाहीर कार्यक्रमांवर बंदी घातली आहे.

<div class="paragraphs"><p>Night Curfew in Madhya Pradesh</p></div>
कोरोनाच्या उद्रेकानंतरचा आतापर्यंतचा सर्वांत मोठा लॉकडाऊन चीनमध्ये लागू

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्णसंख्या आता 236 झाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 65 रुग्ण आहेत. यानंतर दिल्ली 64 आणि तेलंगण 24 अशी रुग्णसंख्या आहे. आतापर्यंत 104 रुग्णांनी ओमिक्रॉनवर मात केली आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 7 हजार 495 नवीन रुग्ण सापडले. मागील 24 तासांत कोरोनामुळे 434 जणांचा मृत्यू झाला आहे. देशभरात आतापर्यंत एकूण 4 लाख 78 हजार 759 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

<div class="paragraphs"><p>Night Curfew in Madhya Pradesh</p></div>
महापालिकेतील पराभव भाजपच्या जिव्हारी; राज्य कार्यकारिणीत मोठे बदल, अनेकांना डच्चू

डेल्टाच्या जागी आता ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे तिसरी लाट (Third Wave) पुढील वर्षाच्या सुरवातीला येईल, अशी माहिती नॅशनल कोविड-19 सुपरमॉडेल कमिटीने केंद्र सरकारला दिली आहे. या समितीचे अध्यक्ष हे प्रा. विद्यासागर हे आहेत. त्यांनी म्हटले आहे की, भारतात ओमिक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. परंतु, ही लाट दुसऱ्या लाटेपेक्षा सौम्य असेल. तिसरी लाट भारतात पुढील वर्षीच्या सुरवातीला येईल. ही लाट फेब्रुवारी महिन्यात उच्चांकी पातळीवर पोचेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com