Datia bypoll result : विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा धमाका; सत्ताधारी भाजपला पराभवाचा जोरदार झटका

Datia Assembly election, Madhya Pradesh bypoll, Ghanshyam Singh, Ashutosh Tiwari BJP : पोटनिवडणुकीत काँग्रेसने घनश्याम सिंह यांना तर भाजपने आशुतोष तिवारी यांना उमेदवारी दिली. खरंतर मिश्रा यांच्याकडून निवडणुकीची तयारी केली जात होती.
BJP vs Congress (AI Image)
BJP vs Congress (AI Image)Sarkarnama
Published on
Updated on

Congress victory : मध्य प्रदेशच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. दतिया विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का बसला आहे. काँग्रेसने २०२३ मधील विजयाप्रमाणेच पोटनिवडणुकीतही भाजपला धूळ चारत विजय मिळविला आहे. काँग्रेसचे उमेदवार घनश्याम सिंह यांनी सहा हजारांहून अधिक मतांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला आहे.

पोटनिवडणूक का झाली?

दतिया विधानसभा मतदारसंघात २०२३ च्या निवडणुकी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र भारती विजयी झाले होते. त्यांनी भाजपचे मातब्बर नेते नरोत्तम मिश्रा यांचा पराभव केला होता. मिश्रा हे त्यावेळी गृहमंत्री होते. राज्यात सत्ता मिळालेली असताना भाजपसाठी हा पराभव जिव्हारी लागणारा होता. काही महिन्यांपूर्वीच भारती यांना एका प्रकरणात कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्याने त्यांची आमदारकी गेली. त्यामुळे पोटनिवडणूक लागली होती.

पोटनिवडणुकीत काँग्रेसने घनश्याम सिंह यांना तर भाजपने आशुतोष तिवारी यांना उमेदवारी दिली. खरंतर मिश्रा यांच्याकडून निवडणुकीची तयारी केली जात होती. ते २००८ पासून सलग तीन निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, त्यांचा पत्ता कट झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. एका सभेत स्वत: मिश्रा यांनाही रडू कोसळले होते. त्यामुळे निवडणुकीच्या निकालाबाबत उत्सुकता वाढली होती.

BJP vs Congress (AI Image)
Cabinet expansion : विधानसभेचे अध्यक्षपद पाटलांकडे, 20 आमदारांना मंत्रिपदाची संधी; महाराष्ट्राशेजारील राज्यात काँग्रेसची खेळी

भाजपला धक्का

भाजपला या निवडणुकीत धक्का बसला आहे. घनश्याम सिंह यांनी १५ फेऱ्यांमध्ये ६६ हजार ७५७ मते मिळविली. तर तिवारी यांना ६० हजार ७४१ मतांवर समाधान मानावे लागले. तिवारी यांच्या विजयासाठी खुद्द मुख्यमंत्री मोहन यादव मैदानात उतरले होते. त्यांनी ठिकठिकाणी सभाही घेतल्या होत्या. मिश्रा यांनीही प्रचार केला होता. पण काँग्रेसच्या रणनीतीसमोर भाजपचा निभाव लागला आहे.

BJP vs Congress (AI Image)
Maharashtra politics : खळबळजनक : महिला नेत्यांच्या आक्षेपार्ह 3500 ऑडिओ क्लिप्स? सूत्रधार शोधण्यासाठी नीलम गोऱ्हे यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव

राज्यात सत्ता असतानाही उमेदवाराला पराभव पत्करावा लागल्याची नामुष्की भाजपवर ओढविली आहे. मिश्रा यांना डावलल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदानातून आपली नाराजी व्यक्त केल्याची चर्चाही आहे. मागील काही दिवसांत यादव यांच्यावरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले होते. त्याचाही पक्षाला फटका बसल्याचे राजकीय विश्लेषकांकडून सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com