Cabinet expansion : विधानसभेचे अध्यक्षपद पाटलांकडे, 20 आमदारांना मंत्रिपदाची संधी; महाराष्ट्राशेजारील राज्यात काँग्रेसची खेळी

DK Shivakumar cabinet, AICC ministers list : कर्नाटकात काँग्रेसचा मोठा डाव; २० नव्या मंत्र्यांसह अध्यक्ष-सभापती बदलून जातीय व प्रादेशिक समीकरणे साधण्याचा प्रयत्न.
DK Shivakumar
DK Shivakumar Sarkarnama
Published on
Updated on

Congress government Karnataka : मागील काही दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या कर्नाटक सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावर अखेर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले आहे. तब्बल २० आमदारांना मंत्रिमंडळात संधी दिली जाणार असून विधानसभा अध्यक्ष व विधानपरिषदेच्या सभापतीही बदलले जाणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीचे जातीय आणि मतदारसंघनिहाय गणित विचारात घेऊन पक्षाने आमदारांना संधी दिल्याची चर्चा आहे.

काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्याकडून मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना २० आमदारांची यादी पाठविण्यात आली आहे. त्यानुसार विधानसभेच्या अध्यक्षपदी जी. एस. पाटील यांची वर्णी लागणार आहे. तर उपाध्यक्षपदी ए. एस. पोनन्ना असतील. सलीम अहमद हे विधानपरिषदेचे नवे सभापती तर उमाश्री या उपसभापती असतील.

नव्या मंत्र्‍यांचा शपथविधी सोमवारी (ता. ३) सायंकाळी होण्याची शक्यता आहे. आमदारांची मंत्रि‍पदासाठी निवड करताना पक्षाने जातीय, धार्मिक समीकरणांसह स्थानिक राजकीय समीकरणांचाही विचार केल्याची चर्चा आहे. मागील महिन्याच्या अखेरीस मंत्रिमंडळाचा विस्तार अपेक्षित होता. त्यासाठी शिवकुमार हे दिल्लीत तळ ठोकून होते. शिवकुमार यांनी ३ जून रोजी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली होती. त्यांच्यासोबत १४ मंत्र्‍यांचा शपथविधी झाला होता. तर २० जागा रिक्त होत्या.

DK Shivakumar
Election Results : भाजपला तीनपैकी दोन बालेकिल्ल्यांमध्ये धक्का; विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निकालात सुरूवातीचे कल विरोधात

मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नव्या २० मंत्र्‍यांमध्ये केवळ एका महिला आमदाराला संधी मिळाली आहे. गायत्री शांतगौडा असे त्यांचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टाने मागील विधानपरिषद निवडणुकीचा निकाल बदलत शांतगौडा यांना विजयी घोषित केले आहे. तर भाजपच्या आमदाराची निवड रद्द केली होती. त्यानंतर काही दिवसांतच शांतगौडा यांना थेट मंत्रि‍पदाची लॉटरी लागली आहे. त्यांना केवळ दीड वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे.

DK Shivakumar
BJP leaders : कोर्टाने भाजपच्या तीन बड्या नेत्यांना केलं मुक्त; माजी केंद्रीय मंत्री, माजी खासदारासह कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश

नव्या मंत्र्‍यांच्या यादीमध्ये पी. एम. नरेंद्रस्वामी, शिवराज तंगडगी, रुद्रप्पा लमाणी, के. एस. बसवंथप्पा, बी. नागेंद्र, टी. रघुमर्ती, बी. झेड. जमीर अहमद खान, रिझवान अर्शद, संतोष लाड, मधू बंगरप्पा, पुत्तूरंगाशेट्टी, मंकला वैद्य, अजय सिंग, एन. चालुवर्या स्वामी, के. एम. शिवलिंग गौडा, एच. सी. बालकृष्ण, बसवराज रायरेड्डी, विजयानंद कशप्पनवर आणि लक्ष्मण सावदी या आमदारांनाही संधी मिळाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com