Vijay Shah : कर्नल सोफिया कुरेशींबद्दल आक्षेपार्ह विधान, हायकोर्ट प्रचंड संतापले... भाजप मंत्र्याची उचलबांगडी होणार?

Colonel Sophia Qureshi Operation Sindoor : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्ताविरोधात भारताने कठोर पावले उचलत ऑपरेशन सिंदूर राबवले. या ऑपरेशनची माहिती देण्याची जबाबदारी केंद्र सरकारने कर्नल सोफिया कुरेशी यांच्याकडे दिली होती.
Madhya Pradesh hc, Colonel Sophia Qureshi And Vijay Shah
Madhya Pradesh hc, Colonel Sophia Qureshi And Vijay Shahsarkarnama
Published on
Updated on

Navi Delhi News : पहलगाम हल्ल्याचा बदला घेतल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले होतं. याची माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविरोधात मध्य प्रदेशच्या मोहन सरकारमधील कॅबिनेट मंत्री विजय शाह यांनी आक्षेपार्ह विधान केलं होतं. या विधानावर आता देशभर संतप्त भावना उमटत आहेत. तर आता हे विधान शाह यांच्या अंगलट आले असून मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने कठोर शब्दात त्यांना फटकारले आहे. तसेच शाह यांच्याविरोधात पुढच्या चार तासात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मध्य प्रदेशच्या डीजीपींना देण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी गुरूवारी (ता.15) सुनावणी होईल असेही म्हटलं आहे. याबाबतचे आदेश न्यायमुर्ती अतुल श्रीधरन यांच्या खंडपीठानं दिले आहेत.

इंदूर जिल्ह्यातील मानपूर भागातील रायकुंडा गावात आयोजित एका हलमा कार्यक्रमात कुरेशी यांच्याविरोधात शाह यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी, ज्या दहशतवाद्यांनी आमच्या महिलांचे कुंकू पुसले, ज्यांनी आमच्या पर्यटकांना मारले, आम्ही त्यांच्याच बहिणीला त्यांच्याकडे पाठवले आणि त्यांना ठार मारले. दहशतवाद्यांनी आमच्या हिंदूंचे कपडे उतरवून मारले त्यांना मोदींनी त्यांच्या बहिणीला पाठवून उद्धवस्त केले. मोदी कपडे त्यांचे काढू शकत नव्हते, म्हणून त्यांनी त्यांच्या (दहशतवाद्यांच्या) समुदायातील एका बहिणीला पाठवून धडा शिकवला.

आता शाह यांच्या या विधानाचा थेट संबंध लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याशी जोडला जातोय. यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होताना दिसत आहे. या वक्तव्यावरून काँग्रेसही आक्रमक झाली असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांच्यासह काँग्रेसचं शिष्टमंडळाने श्यामला हिल्स पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कारवाईची मागणी केली. काँग्रेसकडून शाह यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच शाह यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचीही मागणी लावून धरली आहे.

Madhya Pradesh hc, Colonel Sophia Qureshi And Vijay Shah
Operation Sindoor Survey : ऑपरेशन सिंदूर, युद्धविरामाच्या निर्णयावर मोठा सर्व्हे आला समोर, मोदी सरकारवर जनता खूश की नाराज?

यानंतर पटवारी यांनी, भाजपच्या विजय शाह यांनी सैन्याचा अपमान केला असून त्यांना एक मिनिट देखील मंत्रि‍पदावर राहण्याचा अधिकार नाही. यासंदर्भातील पोलिसांत तक्रार करण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री मोहन यादव यांना देखील काँग्रेसने पत्र पाठवल्याचे ते म्हणालेत.

दरम्यान सोफिय कुरेश यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्री शाह यांनी दिलगिरी व्यक्त करताना माफीही मागितली आहे. त्यांनी, आपल्या वक्तव्यामुळे समाज आणि कोणताही धर्म दुखावला गेला असेल तर आपण माफी मागतो. मी बहीण सोफिया यांचीही 10 वेळा माफी मागतो. मला माफ करा. माझ्याकडून चुकून अपशब्द निघाले. माझे संपूर्ण कुटुंब, कुळ लष्करी असून कुटुंबातील अनेक लोक कारगिल आणि इतर ठिकाणी शहीद झाल्याचेही ते म्हणाले. पण या माफिनाम्यानंतर शाह मोठ्याने हसताना दिसताना दिसल्याने त्यांना त्यांच्या आक्षेपार्ह विधानाचा कोणताही पश्चात्ताप झालेला दिसत नाही. त्यांच्या या हसतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Madhya Pradesh hc, Colonel Sophia Qureshi And Vijay Shah
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर म्हणजे काय? मोदींनी सांगितला अर्थ

भाजप कारवाई करणार का?

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेत ऑपरेशन सिंदूरमधून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. तर या ऑपरेशनची माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी देत देशाच्या रक्षणासाठी जात, धर्म पंत महत्वाचे नसल्याचे दाखवून दिले. पण याच कुरेशी यांना थेट दहशतवाद्यांची बहीण म्हणत वादग्रस्त वक्तव्य शाह यांनी केले. यानंतर आता देशभरात तीव्र भावना उमटत आहेत. काँग्रेसने गुन्हा दाखल करण्यासह त्यांच्या हाकालपट्टीची मागणी केली आहे. पण यावर अद्याप भाजपकडून कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. तर उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे गुन्हा दाखल झाल्यास भाजप कोणती भूमिका घेणार हे आता पाहावं लागणार आहे?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com